या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५२ भाषाशास्त्र. तत्कालीन ऋषींस छन्दाचे ज्ञान चांगले असल्याचे व्यक्त होते. पण हातच्या कांकणाला आरश्याची जरूरच नाहीं, व ज्या गोष्टी स्वयमेव सिद्ध आहेत, त्यांजला अशा बाह्य पुराव्याची देखील अपेक्षा नाही. कारण, कित्येक छन्दांची नांवें तर प्रत्यक्ष ऋग्वेदांतच आढळून येतात. असो. आमच्या पुराणतम ऋग्वेदांतील कित्येक ऋउन्टाचे पौराणस्व. चांचे छन्द त्या प्राक्कालीन ऋषिव । यस इतके हृदयवेधक आणि चित्ताकर्षक वाटत असत की, त्यांचे अनुपम माधुर्य, व अखिल विश्वाचा सुश्राव्य आणि अप्रतिहत स्वरसंवेद, यांचे केवळ ऐक्यच आहे, अशी त्यांची निःसंशय कल्पना असे. | निदानसत्रांत छन्दश्शास्त्राचे सम्यक् विवेचन असून, अनुक्रमणींत ऋग्वेदांतल्या सूक्तांचे प्रणेत्ते, ऋचांचे छन्द, व त्यांच्या देवता, यांसंबंधाचा तपशील मंडलांच्या अनुक्रमानेच दिला आहे. | साहित्य अथवा छन्द, काव्य, आणि अलंकार शास्त्रावर, खाली लिहिलेले ग्रंथकार व त्यांच्या कृती सुप्रसिद्ध आहेत. पिंगलाने छन्दशास्त्र रचले आहे; व पिंगल हाच पतं जाले असल्याचे कित्येकांचे मत आहे. छन्द, काव्य, आणि ग त्याप्रमाणेच खरे असेल तर, त्याचा काल अलंकारावरील ग्रंथ. | इ.स. पूर्वी १४४पासून १२० वर्षांपर्यंत असावा, असे वाटते. दंडीकृत काव्यदर्श इ. स. च्या सहाव्या शतकांतील असून, धनंजयकृत दशरूप हे इ.स.च्या दहाव्या शतकांतील आहे. भोजदेवकृत सरस्वतिकंठाभरण; इ.स.चे अकरावे शतक.मम्मतकृत काव्यप्रकाश; इ.स.चे बारावे शतक.