या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५६ भाषाशास्त्र. ल्याचे दिसते; व त्याचा अर्थ ब्रह्मा असा होतो. ह्यालाच क्वचित् ठिकाणी, फान्चू ( म्हणजे ब्रह्माक्षर ) असेही म्हटल्याचे आढळून येते, व त्यावरून सुद्धाच्या ठिकाणी चिनी लोकांचे प्रेम उत्तम रीतीने व्यक्त होते. इ. स. ६५ नन्तर, बौद्धधर्माला चिनांत राजाश्रय मिळाबौद्भग्रंथ उपलब्ध ला, आणि त्यामुळे, त्याची तत्त्वे व होण्यासाठी चिनीवा- तत्संबंधी एकंदर ग्रंथसंपत्ति उपलब्ध दुशहाचे प्रयत्न, व भर- होण्यासाठी, मिंगटी नांवाच्या चिनी तखंडाशी दळणवळण, बादशहाने साई-इन् व दुसरे कामगार हिंदुस्थानांत पाठवून, मातंग आणि चो-फालान हे दोन विद्वान बौद्ध, या कामी लाविले. त्यानंतर, बौद्धधर्माची चिनी भाषेत पुष्कळच भाषान्त झाली, व तेव्हांपासून भरतखंड आणि उत्तरेकडील आशिया यांच्या दरम्यान, हिमालयाच्या खिंडीतून, धर्मविषयक दळणवळण विलक्षण रीतीने सुरू झाले. ज्याप्रमाणे आम्हां भारतीयांस काशीक्षेत्राचे विशेष महत्व वाटते, त्याचप्रमाणे चिनी लोक भरतखंडाला पवित्र मानीत. सुमारे तीनशे वर्षांनंतर चिनांतून भरतखंडांत अनेक यात्रेकरी येऊ लागले; व ह्यापैकीच फाहियन् हा एक होय. हा ठिकठिकाणी फिरला, आणि मोठ्या परिश्रमानें हरतहेची माहिती त्याने मिळविली. चीन देशांतूनही अनेक राजदूत इकडे पाठविण्यांत येत, व धार्मिक, सामाजिक, नैतिक, राजकीय, पौराणिक, प्राचीन, अर्वाचीन, इत्यादि नाना प्रकारचा आहवाल ते आपल्या बादशहास जाहीर करीत. फाहियन् हा इ. स. ३९० च्या आत बाहेर भरतखं