या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग सहावा. वर्ण विचार. मागील भागांत, भाषाशास्त्रासंबंधाने आमच्या प्राक्का लीन आर्यपूर्वजांनी व इतर पौरस्त्य विचार: राष्ट्रांनी जे परिश्रम केले, त्याविषयींचे यथावकाश विवेचन झाले असून, प्रस्तुत भागांत पाश्चात्य लोकांनी भाषाविषयक प्रयत्न करून हे शास्त्र उदयास आणण्याची जी खटपट चालविली, त्याबद्दलची हकीकत देण्याचा आमचा विचार होता. परंतु, वर्ण आणि लिपी, यांचा पौरस्य, किंबहुना आर्य परिश्रमाशी इतका कांहीं निकट संबंध आहे की, मागील भागाला लागूनच भाषेतील वर्ण आणि लिपि यांचेही अवश्य तें दिग्दर्शन झाले पाहिजे; व ते होणे देखील विशेष प्रशस्त आणि इष्ट होय. सबब, त्यांचेच इतिवृत्त प्रथमतः येथे देत. | ह्या भूतलावरील एकंदर भाषांचे आपण काळजीपूर्वक अवलोकन केले, आणि गुणदोष विवेभाषापरीक्षण. चनार्थ यांजकडे शास्त्रीय दृष्टीने पाहिले, तर आपल्याला असे निःसंशय दिसून येईल की, ह्यापैकी कांहीं भाषा अगदी उच्च पदवी प्रत पोहोचलेल्या असून, कित्येक मध्यमावस्थेत आहेत. आणि राहिल्या साहित्यांची तर केवळ निकृष्टदशाच आहे, असेही म्हणावे लागते