या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार, २७३ अनुस्वारे विवृत्यां तु विरामे चाक्षरद्वये । । द्विरोष्ठयौ तु विगृण्हीयाद्यत्रौकारवकारयोः ॥ २४ ॥ (शिक्ष..). अशाप्रकारे, अखिलवर्णोद्गमाचें आदिस्थान जे कंठ, त्यांत उत्पन्न होणारे यच्चावत् वर्ण आमच्या वैयाकरणांनी प्रथमतः घेतले; आणि नन्तर, तालु, मूर्धन्, दन्त, व ओष्ठ, या स्थानांतील वर्णाची व्यवस्था अनुक्रमानें लाविली. पण, तसे करण्यांत देखील त्यांनी आपले नेहेमींचे अपूर्व चातुर्य दाखवून, आणखी एक सूक्ष्म विवेचन केले. ते असे की, त्यांनी प्रथमतः शुद्ध स्वर घेऊन, नंतर संयुक्त स्वरांची योजना केली. इतकेच नव्हे तर, ह्या शुद्ध स्वरांत सुद्ध, उच्चारण्यास स्वल्प असे जे व्हस्व स्वर त्यांची प्रथम योजना करून, नन्तर त्यांनी त्या त्या जातीचे दीर्घ स्वर घेतले, व तदनन्तर संयुक्तस्वरांची, आणि अनुस्वारविसगांची योजना केली. पुढे, ज्या त्या स्थानांतली त्यांनी व्यंजने घेतली, आणि त्यांतही प्रथम मृदु, तदनन्तर कठोर, व शेवटीं अनुनासिक, याप्रमाणे त्यानीं स्थानानुक्रमाने व्यवस्था लाविली. आमच्या प्राकृत भाषा संस्कृतोद्भवच असल्या कारणाने, त्यांतील स्वर आणि व्यंजनसंख्या बहुतेक संस्कृताप्रमाणेच आहे. मात्र, भेद म्हणून इतकाच की, प्लुत लुकार, व क आणेि ४ प असे विसर्गद्वय, हे प्राकृतांत नसन, क्ष १ ह्या शिक्षेचा प्रवर्तक पाणिनि होय, व हा ऋषि फार प्राक्कालीन असल्याचे दिसते. कारण, त्याचा काल डाक्तर भांडारक या मते इ० स० पूर्वी सातशे वर्षे असून, पंडित सत्यव्रत सामश्रमींच्या अभिप्रायाप्रमाणे, तो ई० स० पूर्वी २४०० वर्षे होऊन गेला असावा, असे वाटते.