या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८४ भाषाशास्त्र. (s) चे मूल्य सकारार्थी ठरले असतांही, त्या वर्णाकडून हा कार्यभाग जरूर त्या प्रत्येक ठिकाणी करून न घेतां, त्याच्या ऐवजी सी (C) चाच उपयोग वारंवार केलेला दृष्टीस पडतो. Cement, Civil, इत्यादि ह्याचीच उदादरणे होत. आतां, सी (C) चे मूल्य एस (S) सारखेंच समजावे तर, तसे देखील दिसून येत नाही. कारण, सी (C) चा उच्चार 'क' प्रमाणे ही होते. इतकेच नव्हें तर, एकाच शब्दांत, सी (C) चा उच्चार क आणि स या प्रमाणे झाल्याचे आढळून येते. म्हणजे अर्थातच, त्याचे मूल्य भिन्न भिन्न स्थळी निरनिराळे होत असल्याचे उघड होते. उदाहरणार्थ, Cancave, Concur; Conceive, Conceal; इत्यादि. । | शिवाय, कच्या मूल्याचा केवळ सी (C) शब्दच आहे, असे नाही. तर, के ( K ), व क्यू ( (2), ह्यांचे सुद्धा तेच मूल्य आहे. ह्यावरून, एकाच मूल्याचे म्हणजे उच्चाराचे अनेक वर्ण ह्या भाषेत असल्याचे सिद्ध होते. आणि ज्यापेक्षां ते सर्व निरर्थक व निरुपयोगी आहेत, त्यापेक्षां वर्णातिरेकाचा दोष केवळ घरी चालून आल्यासारखेच आपणांला मानावे लागते. | २ अपूर्णता अथवा वर्णाभावाचा दोष तर, ह्या पा. | श्चात्य भाषेत पदोपदी व्यक्त होतो. अपर्णता अगर व र्णाभाव. अगर व कारण, भरपूर वर्ण नसल्यामुळे, भरपर व नम-n:* इच्छित उच्चार संपादण्यासाठी, अन्य वर्णाची अपेक्षा करावी लागते, व त्याचे साहाय्य घेणेही जरूर पडते. उदाहरणार्थ, 'च' कार मूल्याचा आणि