या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ई भाषाविषयक पाश्रत्य प्रयत्न. ३१७ एक विशेष फायदा झाला असता. तो हा की, बाबिलन्च बाणाकृति लिपि, आणि मिश्र देशांतील काहीवर्णसंज्ञा उकलण्याच्या संबंधाने हल्ली जे अकाण्डतांडव चालले आहे, व त्या बाबतींत जी उरस्फोड पडली आहे, आणि प्रस्तुत काळी देखील तत्संबंधाने जी जिकीर सोसावी लागत आहे, तिचे कारणच पडले नसते. असो. याप्रमाणे, भाषाशास्त्राच्या कामी अशा प्रकाग्रीक लोकांची इति- रची उत्तम व अनकूळ संधी मिळाली कर्तव्यपरांडमुखना, व असूनही, ग्रीक लोकांनी बराच काळ. परकीयांचा उत्साह. पर्यंत, किंबहुना आमचा सहवास होईपर्यंत, ह्या अमूल्य संधीचा, अथवा आपल्या ज्ञानाचा, सुधारणेचा, आणि बुद्धिवैभवाचा, कांहीं एक उपयोग करून घेतला नाही, ही मोठ्या खेदाची गोष्ट होय. परंतु, त्यांतही विशेष आश्चर्याची गोष्ट ही की, ज्या परकीयांस ग्रीक लोक केवळ विजयोन्मादांत व आपल्या शहाणपणाच्या घमेंडींत जंगली म्हणत, त्यांनीच इराणी, आणि विशेषतः संस्कृत भाषेचा अभ्यास करून, आपल्या ज्ञानात भर पाडली. फारतर काय सांगावे पण, ह्या ज्ञानार्जनानेच पाश्चात्य देशांत विद्येचा थोडाबहुत फैलाव होऊन, लोकांत जास्त चळवळ सुरू झाली. कारण, कालान्तराने, शिकन्दराबाद ( आलेगझांड्रिया ) हे व्यापाराचे मथक होऊन, ते विद्यापीठ बनले. इतकेच नव्हे तर, तेथे अनेक प्रकारच्या विषयांवर ऊहापोह होऊ लागला. आपापल्या देशाचे कायदे व कानू, रीत आणि रिवाज, धर्म व नीति, याबद्द लची आपापसांत चर्चा सुरू झाली; आणि भारतीय कवि व ऐतिहासिक, शास्त्रज्ञ व पंडित, आत्मवादी व लोकाय