या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. । ३२१ मुळे, त्यांजला ह्या भाषेची महत्वी जास्त वाटावी, ह्यांत कांहींच आश्चर्य नाहीं. इ. स. पूर्वी ४९५ साली, रोमन लोकांस कायदेकानू करण्याची इच्छा झाली. परंतु, त्यांची तत्वे कोणत्या धर्तीवर असावीत, हे त्यांस कळेना. ह्मणून त्यांनी कित्येक गृहस्थ ग्रीस देशांत पाठवून, त्यांजकडून सोलने केलेल्या अथेन्स येथील, व अन्य ठिकाणची, व्यवहारशास्त्रविषयक माहिती मिळविली. याप्रमाणे, एकंदर सर्व ग्रीकमय होता होता, त्याची मजल येथ. पर्यंत येऊन ठेपली की, रीतरिवाज, पेहेराव पोषाक, बोलणे चालणे, लिहिणे वाचणे, इत्यादि संबंधाने, ग्रीकशिवाय बिलकुल पानच हलेनासे झाले; आणि त्याचा अखेर परिणाम असा झाला की, ग्रीक भाषेचे ज्ञान हे एक संभावितपणाचे लक्षणच बनले. रोमचा पहिला इतिहास इ. स. पू. २०० वर्षे, ग्रीकमध्येच तयार झाला, व तो फेबियस पिक्टरने लिहिला. टायबीरियस ग्रॉकस हा व्होडज येथे परराज्य प्रतिनिधि (consul ) होता. तथापि, प्रसंगविशेषी, आपली स्वभाषा जी ल्याटिन् तींत आपले विचार प्रदर्शित न करितां, त्याने इ. स. १७७ साली ग्रीक भाषेतच भाषण केले. ( MIommsen ). प्लॉमिनियसला समजण्याकरितां, ग्रीक लोकांनी जेव्हां ल्यॉटिन् भाषेत त्याचे अभिनन्दन केले, तेव्हां तो स्वतः ल्याटिनमध्ये न बो. लतां, त्याने त्यांस उत्तरादाखल म्हणून ग्रीक भाषेतच कांहीं श्लोक रचले. अशा प्रकारे, ग्रीक भाचे जणुकाय वेडच पिकल्यासारखे झाले; आणि त्यामुळे, गुणावगुणांचा योग्य विचार न होतां, सकट घोडे बारा टक्के, याप्रमाणे