या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिश्रम, ३३२ भाषाशास्त्र. ठिकाणी असे स्पष्टपणे कळविले आहे की, हीब्यूला मूळभाषा ह्मणणे म्हणजे वृक्षाच्या अनेक शाखांसच मूळ खोड म्हणण्यासारखे होय. आणि म्हणूनच, अशा प्रकारची कल्पना विसंवादी असून, ती वस्तुस्थितीपासून दूर आहे, व विश्वाच्या एकंदर नियमास बिलकुल अनुसरून नाहीं. अनेक भाषांची माहिती एकत्र करण्याच्या संबंधाने, लीबनिझने नितान्त परिश्रम केले, ही त्या कामी त्य । त्याच गोष्ट कोणालाही कबूल केली पाहिजे. निकोलस विसेन्, राहणार ऑम्स्टर्डम्, हा इ. स. १६६६ ते १६७२ पर्यंत रशियांत फिरत असतां, लीबानझने त्याला असे लिहिले की, “आपण कृपा करून चांगला शोध करावा, आणि शक, सामोयेडी, सैबीरी, बषकीर, कालमुक, तुंगुसी, इयादि भाषांची योग्य माहिती मिळवावी.' पुढे, कालान्तराने, पीटर बादशहाची ओळख झाल्यावर, त्याने त्यासही पत्र पाठविलें व अशी त्याचे बादशहास पत्र. विनंती केली की, “महाराज, आपलें | राज्य फार विसृत असून, आपली हुकमत अनेक राष्ट्रांवर आहे. परंतु, त्यांत ज्या कित्येक भाषा व्यवहारांत आहेत, त्यांची माहिती कोणासही नसून, त्याचे परिशीलन देखील त्याच कारणाने अद्यापिसुद्धां कोणीच केलेले नाही. सबब, त्यांतील अनेक भाषांचे शब्द एकत्र करून, त्यांचा आपण एक कोश बनवावा. अथवा, निदान त्या शब्दसंग्रहाची एक लहानशी जंत्री तरी तयार करविण्याचे | १ ह्याचे प्रवासवर्णन इ. स. १६७७ साली छापले गेले.