या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०४ भाषाशास्त्र, पाणिन्याद बाहुलकं प्रकृतेस्तनुद्दष्टे प्रायसमुच्चयनादपितेषाम् । कार्यसशेषविधेश्च तदुक्तम् । नैगमरूढिभवं हि सु साधु ।। १ ।। नामच धातुजमाहानिरुक्ते । व्याकरणे शकटस्यच तोकम् ।। यन्नविशेष पदार्थ समुत्थं प्रत्ययतः प्रकृतेश्च तदुह्यम् ॥ २ ॥ ( पतंजाल महाभाष्यम् । उणादयो बहुलम् ३. ३. १ ) परंतु, हे प्रतिपादन सदोष असल्यामुळे निःसंशय आ शंकनीय आहे; आणि म्हणूनच, व्युत्पत्तिवाद.

  • त्यासंबंधाने दुसरे अनेक वैयाकरण

साधार व योग्य आक्षेप घेतात. अर्थात् , ते असे म्हणतात की, ** नामच धातुजम् ' हा सिद्धान्ताचा असा बिलकुल नियमच नव्हे. कारण, कित्येक शब्द केवळ निरवयवच आहेत; आणि त्याचकारणाने, त्यांत प्रकृति व प्रत्यय यांचा साहजीकच अभाव असतो. तेव्हां, अशा प्रसंगी, * नामच धातुजम् , या नियमाची सिद्धता कशी करावयाची १ अर्थात् , ती होत नाही, हे उघड आहे. तथापि, व्युत्पन्नत्ववादी एवढ्यानेच हार जात नसून, कुंठितही होत नाहीत. ते आणखी अशा कल्पना लढवितात, व अतक्र्य कोटिक्रम करतात की, अशा प्रकारच्या अडचणीच्या वेळी, ह्या शब्दांत प्रकृति किंवा प्रत्यय प्रछिन समजुन, ते अध्याहृत धरावेत, अथवा कल्पावेत.