या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६४ भाषाशास्त्र. | ओजः समासभूयस्त्वमेतद्गद्यस्यजीवितम् ।। ( काव्यादर्श. १. १० ). मागे, यौगिक शब्दांचे निरूपण करतांना, प्रत्यय आणि अव्यय यांचा आम्हीं वारंवार उल्लेख केला असून, त्यांचा परस्पर कसा संबंध असते, हेही प्रसंगविशेष दाखविलें आहे. तथापि, प्रत्यय व अव्यय म्हणजे काय, ते अर्थबोधक आहेत किंवा अर्थविरहितच समजावयाचे, ते कसे उत्पन्न झाले आहेत, आणि ते सविभक्तिक मानावयाचे की कसे, याविषयीचे विवेचन करणे निःसंशय ज्यास्त अवश्य छतेचे व अगत्याचे आहे. सबब, ते येथे करत. सामान्यतः, ज्या शब्दावयवाचा प्रयोग स्वातंत्र्याने कधीही प्रत्ययाचे लक्षण व होत नसून, जो नेहेमीं परावलंबी अत्यास आलेले शब्दाचे सतो, त्यास प्रत्यय अशी संज्ञा आहे. मूल्य. | किंबहुना, प्रत्ययाचे लक्षण म्हटले म्हणजे, संज्ञेनें अगर संकेतानेच अर्थ व्यक्त करणे, हे होय. उदाहरणार्थ, की, णारा, णावळ, वगैरे प्रत्यय, धंदा किंवा वृत्ति, कर्तृत्व, व मोल, इत्यादींचे वाचक असन, ते, ते तो अर्थ, केवळ संकेतानेच क्रमशः व्यक्त करतात. जसे प्रधानकी, मिळवणारा, घडणावळ, इत्यादि. आणि म्हणनच, ह्या दृष्टीने पाहिले म्हणजे, अशा प्रकारच्या प्रययांस देखील शब्दाचे मूल्य खाचतच येते, असे अवश्य ह्मणावे लागते. अर्थात, हे प्रत्यय अर्थबोधक असून निरर्थक नाहीत, इतके कोणालाही कबूलच केले पाहिजे. फार तर काय सांगावें, पण, ज्या वर्णात अर्थबोध करण्याचे सामर्थ्य सांप्रत नाहीं असे आपण समजतो, अथवा ज्यांस आपण केवळ ह्याच