या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६६ भाषाशास्त्र, व्यय. येच समजण्यात येतात, असे ह्मटले असतांही अन्यथा होणार नाही.

  • म्हणजे ' शब्दाची हकीकत देखील अशाच मास

त्याची आहे. कारण, हा शब्द मुक्रियापदाच अ- ळचा क्रियापदरूप असन, ता सां प्रत केवळ अव्ययच झाला आहे. व्याकरणदृष्टीने पाहतां, ‘म्हणजे' या शब्दांत, म्हणजे अशी दोन पदें अमन, “ म्हण' हा शब्द संस्कृत * भण' शब्दाचा अपभ्रंशच असावा, असे वाटते. आतां, “ भण' धातूचा अर्थ बोलणे असा होतो, आणि 'जे' हा वर्ण प्राचीन महाराष्ट्रभाषेत केवळ पूरणार्थीच उपयोगात आणला असल्याचे दिसते. उदाहरणार्थ, बोलिजे, कारजे, दाविजे, इत्यादि. ह्यावरून, ‘म्हणजे' शब्द मुळचे क्रियापदच होय. परंतु, हल्ली त्याचा तसा उपयोग न होतां, तो फक्त अव्ययाप्रमाणेच करण्यांत येतो, असे वाचकाच्या लक्षांत सहज येईल. त्याचप्रमाणे, आणि ' शब्दाचा प्रथमच अर्थ व सांप्रतचा उपयोग, हे सुद्धां ध्यानांत सर्वनामाचे अवयव. ठेवण्यासारखे आहेत. ह्या शब्दाचे मूळरूप म्हटलें म्हणजे, संस्कृतांतील 'अन्य' शब्द होय. व * आणि ' हा त्याचाच अपभ्रंश समजावयाचा. परंतु, त्यांच्या अर्थात व व्याकरणसंज्ञेत हल्ली केवळ जमीन अस्मानाचे अंतर पडल्याचे दिसते. कारण, संस्कृतांत - अन्य हे सर्वनाम असून, त्याचा अर्थ * दुसरा' असा होतो. परंतु, मराठींत आणि हे उभयान्वयी अव्यये आहे, आणि त्याचा अर्थ 'व' असा समजण्यांत येतो.