या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ भाषाशास्त्र. पवित्र धर्मग्रंथच होय; आणि हा झन्द भाषेत आहे. आमच्या आर्यहिंदूस ज्याप्रमाणे वेद हे सर्व प्रकारे प्रमाण ग्रंथ आहेत, त्याचप्रमाणे झन्दअविष्टा हे पारसीकांस होत. ह्यांतील बराच भाग झरथुष्ट्राने केलेला असून, त्याला गाथा अशी संज्ञा आहे; व झरथुष्ट हा पार्शी लोकांचा धर्मगुरु असल्याबद्दल सर्वांसच महशूर आहे. झरथुष्टाचा काल अजूनही निश्चित नाही. तथापि, तो इ० स० पूर्वी दोन तीन हजार वर्षांपलीकडील कालांत उदयास आला असल्याचे दिसते. किंबहुना, धर्मगुरु म्हणून, झरथुष्ट्र नांवाचा हा पहिलाच पुरुष होय, आणि ह्याला पुण्यश्लोक समजूनच ह्याचें नामधेय अन्य राजपुतांनी कालान्तराने धारण केले असावे, अशी कल्पना होते. बॉबिलन येथील मीड घराण्यातील पहिल्या राजाचे नांव झरथुष्ट असल्याचे कळते, व तो इ० स० पूर्वी २२३४ वर्षांच्याही अगोदर होऊन गेला, असे वर्णन आहे. १ डा. हौ म्हणतो, " The portion compared with the whole bulk of the whole fragments is very small; but by the difference of dialect it is easily recognized. The most important pieces written in this peculiar dialect are called Gathas or songs, arrar:ged in five small collections; they have different metres, which mostly agree with those of the Veda; their language is very near to the Vedic dialect. " (इ० स० १८६१ साली, डा. हौने पुणे येथे दिलेले व्याख्यान पहा.) २ * Berosus, as preserved in the Armenian translation of Eusebius, mentions a Median dynasty ( पुढे चालू )