या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ४. आपली बस्ती केली. हुगनू अशी ज्या जातीस संज्ञा होती, तिलाच चिनी लोक तुकिऊ पण ह्मणत. किंबहुना, तुकिऊचाच तुक असा अपभ्रंश होऊन, हा शब्द प्रचारांत आला असल्याचे दिसते. ह्यांचा व चिनी लोकांचा नेहेमीं झगडा चाले, व त्यांत त्यांचा पराजय देखील होई. परंतु, योग्य संधी सांपडली की, ते पुनश्च चिनी लोकांवर चालून जात, आणि त्यांजला वारंवार त्रास देत. शेवटीं, इ० स० १२९७ साली, त्यांच्यांत अगदी निकराचे युद्ध होऊन, तुकाचा पराभव झाला, व ते तरफण, काशगर, खामिल, आणि अक्सु, येथे जाऊन राहिले. ह्या तुकत अनेक जाती आहेत, व त्यापैकीं उझबेग, | नोगाई, कुंन्दुर, बजाणी, कुमुक, तुकाच्या जाती व बषकीर, मीसचिराक, कार-कलपाक, त्यांचा प्रसार. तातेर, उरणहट, बरबास, याकुत, किरगीज, किरगीज-कासक, किरगीज-बुद्रुक, किरगिजदरम्यान, किरगिज-खुर्द, इत्यादि मुख्य होत. उझबेक हे उग्री आणि हुइहे यांचे वंशज असून, त्यांनी आपला पहिला तळ खाटेन, काशगर, तरफण, व खामिल, येथे दिला. पुढे इ० स० च्या सोळाव्या शतकांत ते जगत्सरित वलांडून पलीकडे गेले, आणि अनेक मोहिमा करून, बाल्ख, खीवा ( खारिजम, ) बुखारा, व फरघाणा, हे प्रांत त्यांनीं आ पल्या कबजांत घेतले. नोगाई जात कास्पियन समुद्राच्या पश्चिमेस आणि काळ्या समुद्राच्या उत्तरेस राहते. इ० स० च्या सतराव्या शतकापर्यंत, त्यांची वस्ती कास्पियनच्या ईशान्येस होती, असे इरटिश नदीच्या डाव्या बाजूला जी