या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. हीं होत. उरणहट जात चुलिम नदीवर राहते, व बरबास लोक इरटिश आणि ओबी नदी, यांच्या मधील पठार प्रदेशावर वस्ती करतात. ह्या सैबीरी-तुकीच्या भाषेत, मोगली, सामोयेडी, व रूस भाषांतील अनेक विजातीय शब्दांचे बरेच मिश्रण आहे. तथापि, तेही मुख्य शाखेतील शब्दांश पुष्कळ साम्य पावतात. आशियाखंडाच्या ईशान्येर व लेना नदीच्या दोन्ही बाजूला, याकुत नांवाचे लोक राहयाकुती व तुर्की भापांचे सूक्ष्मावलोकन. - तात. ह्यांच्या एकंदर संख्येचा " अजमास लागत नाही. तथापि, इ० स० १७९९ साली, फक्त पुरुषांचीच टीप १०,०६६ झालीअसल्याचे कळून येते. रूस लोकांस ह्यांची माहिती प्रथमतः इ० स० १६ २० साली झाली. हे आपणांस सख ( शक? ) म्हणवितात, आणि ह्यांची मूळ वस्ती बैकल सरोवराच्या ईशान्येस असल्याचे समजते. भाषेचा अपभ्रंश ज्या कारणांनी होतो, त्या कारणांचा संस्कार व अनिष्ट परिणाम याकुती भाषेवर न झाल्याने, ह्या भाषेचे मूळचे स्वरूप अथवा शब्दाचे मूलरूप फारसे बदललें नाहीं; किंवा त्यांत म्हणण्या सारखा फेरफारही झाला नाहीं. त्यामुळे, उसमानी सारख्या प्रौढ आणि नावाजलेल्या तुर्की भाषांचे परिशीलन करण्यास, ती एक गुरुकिल्लीच आहे, असे म्हटले असतां चालेल. तुर्की-तार्तरांत किरगिज जात विशेष नांवजलेली आहे. हिची वस्ती, ओबी आणि येनिसी किरगिज लोक. यांच्या दरम्यानच्या प्रदेशांत, प्रथमतः ?