या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ ३ | भाषाशास्त्र. सैन्यास कासवापोलीच्या लढाईत जिंकले. अशाच प्रकारे बायझेटने पण क्रम चालविला, व थेसली आणि थर्मापिली घेऊन, पिलापोनीसस उध्वस्त केलें. ह्याला अटकाव करण्यासाठी, जर्मनीचा बादशहा सिगिस्मंड हा देखील, फ्रेंच, जर्मन, व स्लॉव्ह सैन्यानिशीं त्याजवर चाल करून गेला. परंतु, त्याचे कांहीं एक न चालतां, इ० स० १३९९ साली, निकापोलीसच्या लढाइंत त्यालाच हार खावी लागली. पुढे, बायझेट्ने बोस्निया पण घेतले; आणि त्याचा इरादा कुस्ततुनिया सर करण्याचा होता; इतक्यांत, तैमूरचा व त्याचा सामना होऊन, ग्यालेशियांत अंगोरा ( अंकिर ) येथे युद्ध जुपलें, व इ० स० १४०२ साली बायझेट्चा पराभव झाला. तदनन्तर, तैमूर मरण पावला, आणि इ० स० १४१३ साली, पहिल्या महमदाच्या कारकीर्दीत, तुर्की लोकांची फिरून जमाजम होऊन, इ० स० १४२१ साली, दुस-या मुरादला पहिले सर्व वैभव पुनश्च प्राप्त झाले. त्यामुळे, तो पुन्हा सज्ज झाला, व त्याने आपले सैन्य आणखी एकदां डॉन्यूब नदीवर पाठविले. ह्यावेळी सुद्धां, हँगारी व स्लॉव्ह लोकांनी हरकत केली. परंतु, इ० स० १४४४ साली वर्णा लढाईत, व इ० स० १४४८ साली कोसवा लढाईत, मुरादला पूर्ण जय मिळून, त्याने कुस्तंतुनियेवर हल्ला केला. इतकेच नव्हे तर, सर्व यूरोपांतले वीर पुरुष त्याच्या छातीवर असूनही, त्याने त्यांस झुगारून दिले, आणि ता. २६ मे ३० स० १४५३ रोजी, त्याने मोठ्या बहादुरीने ते शहर घेतलें, व तेथे आपली राजधानीही स्थापिली.