या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ५९ | आकाश हे शब्द आकाश, अवकाश, अथवा पोकळी. किंवा ध्वनीचे उत्प- येथेच तो उत्पन्न होतो, ही गोष्ट त्तिस्थान. | निर्विवाद आहे. सबब, जास्त शोध करण्यासाठी, आपण आणखीही पुढे प्रवेश करूं, आणि ध्वनि कसा निर्माण होतो, कोणत्या आकाशांत हा वायुतरंग उदभवता, त्याच्या लाटा कशा उसळतात, ह्या लाटांचा आघात कोणत्या प्रकारे होतो, त्यांचे कार्य कोणत्या इंद्रियावर घडते, व त्यामुळे श्रवणोत्पत्ति कशी होते, या विषयींची तपशीलवार हकीकत थोडक्यांत देऊं. वैशेषिक दर्शनांत, १ द्रव्य, २ गुण, ३ कर्म, ४ साध्वनीपासून श्रवण. मान्य, ६ विशेष, आणि ६ समवाय, या सहा पदार्थांचे वर्णन दिले असून, द्रव्यांत १ पृथ्वी, २ आप, ३ तेज, ४ वायु, ९ आकाश, ६ काल, ७ दिश', ८ आत्मा, व ९ मन, यांचा समावेश केला आहे. तथापि, आपला प्रस्तुत विषय ध्वान आणि श्रवणच असल्यामुळे, सदरहू पदार्थ व तत्वे, यांपैकी आपल्याला फक्त वायु, आणि आकाश, यांचाच विचार कर्तव्य आहे. वायु हैं। एक पंचमहाभूतांपैकी सर्वव्यापी तत्व असून, ते सर्वांस महशूर आहे. आकाश हे देखील एक पंचमहाभूतांपैकीच तत्व होय. हे ध्वनीचे, अर्थात् शब्दाचे सुद्धा, प्रसूतिस्थान आहे; इतकेच नव्हे तर, ते सर्वव्यापि, नित्य, आणि ह्मणूनच अविनाशी आहे. आतां, कित्येक निमित्तकारणांनी वातावरणावर प्रहार होऊन, अथवा एखाद्या वारिसमुदायांत दगड टाकल्यामुळे, पाण्यांत ज्याप्रमाणे अनेक लाटा उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे वायूवर सुद्धा अनेक कारणांनी आघात