या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इ ७४ भाषाशास्त्र. | ते सूक्ष्म वस्तूची शुद्धि । ज्ञप्तिमात्र ॥ २१ ॥ ( दासबोध १-३.) । | ह्या समर्थाचा उदयकाळ म्हटला म्हणजे, इ० स० चे सतरावे शतक होय. वाचा कोठे व कशी उत्पन्न होते, याविषयी श्रीधरतद्विषयक श्रीधरोक्ति. स्वामिनीसुद्धा एके ठिकाणीं वर्णन केले आहे. ते म्हणतात, या सा मित्रा वरुणसदनादुच्चरन्ती त्रि पष्टिं वर्णानन्तः प्रकटकरणेः प्राणसंगात् प्रसूते ।। तां पश्यन्ती प्रथममुदितां मध्यमां बुद्धिसंस्था वाचं वक्त्रे करणविशद वैखरीच प्रपद्ये ।। हे श्रीधरस्वामी फारच विद्वान असून, ते इ० स० च्या सोळाव्या शतकांत उदयास आले असावेत, असे वाटते. राजा भोजदेवाने वाग्देवांचा प्रभाव मनांत आणून, तिला नमन केले; आणि सरस्वती कंठाभरणांत तिला आदिस्थान दिले. आतां, हा राजा इ० स० च्या अकराव्या शतकांत उदयास आला असल्याचे समजते; व त्यावरून, तितक्यापुरातनकाळी देखील, भाषाशास्त्रासंबंधी बरीच चळवळ आणि हालचाल आमच्या भरतखंडांत सुरू झाल्याचे भासमान होते. ध्वनिर्वणः पदं वाक्यमित्यास्पद चतुष्टयम् ।। म्य- यस्थाः सूक्ष्मादिभेदेन वाग्देवी तामुपास्महे ॥१॥ ( सरस्वती कंठाभरणं. १ परिच्छेदः ) १ Weber's History of Sanskrit Literature. P. 210 Note 220.