या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपात्त, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ७५ सूतसंहितेवर टीका करतांना, माधवांनीं आचार्यांच्या आचार्य मत. श्लोकाचे अवतरण, आपल्या प्रकृत विषयाच्या पुष्टीकरणार्थ केले आहे; आणि त्यांतही वर्णात्मक वाचेच्या उत्पतीचे स्थान, व तिच्या उगमाचे प्रकार सांगितले आहेत. मूलाधारात्प्रथममुदितो यस्तु भावः पराख्यः । पश्चात्पश्यत्यथ हृदयगो बुद्धियुङमध्यमाख्यः । वक्त्रेवैखर्यथ रुरुदिषोरस्यजन्तोः सुषुम्णां । बद्धस्तस्माद्भवति पवनः प्रेरितो वर्णसंज्ञः ॥ श्रीशंकराचार्यांचा काळ म्हटला म्हणजे, इ० स० चें आठवें शतक होय. • तसेच, ह्या वाग्देवीच्या प्रचंड प्रभावाबद्दल भवभूति भवभूतीची उक्ति. कवीस मोठी धन्यता वाटून, त्याने आपल्या सुप्रसिद्ध व जगन्मान्य उत्तररामचरित नाटकांत, तिच्याविषयी मोठ्या गौरवाने आणि आदरपूर्वक लिहिले आहे. कामान् दुग्धे विप्रकर्षत्यलक्ष्मी कीर्तिसूते दुष्कृतं या हिनस्ति । तांचाप्येतां मातरं मंगलानां धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः । ( उत्तररामचरित. अंक ६) हा कविपुंगव इ० स० च्या आठव्या शतकांत उदयास आला असून, त्याच्याही पूर्वी आवाणीच्या संबंधाने णखी एका रसिक व मर्मज्ञ कवीने, भर्तृहरीचा अभिप्राय. ह्या वाग्देवीच्या संबंधाने लिहून, तिला सर्व भूषणांच्या अगदी शिरोभागींच बसविले आहे. इ