हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुरवाळतात. मनू ती सोन्याची नाणी कुरवाळी. हातांत घोळून घोळून ती सोन्याची नाणी गुळगुळीत झाली होती. 'शंभर झाली माझी नाणी, आता सव्वाशे होतील. सव्वाशेची दीडशे व दीडशेची दोनशे होतील.' असे तो मनात म्हणे व त्या मोहरांचे चुंबन घेई.

 त्याच्या हृदयातील ओलावा एखादे वेळेस नकळत प्रकट होई. मनूच्या घरात फारशा वस्तू नव्हत्या. एक मातीचा घडा होता, तो मनूला फार आवडे. त्या मडक्यावर त्याचा जीव होता. तो घडा घेऊन विहिरीवर जाई व रोज भरून आणी. हलक्या हाताने तो घडा मनू स्वच्छ करी. त्या घड्यातील निर्मळ पाण्याकडे तो बघत राही. 'मनुष्याच्य डोक्यपेक्षा हा घडा निर्मळ आहे. डोक्यात घाणेरडे विचार येतात, परंतु माझ्या मडक्यात घाणेरडे पाणीही निर्मळ होते!' असे तो म्हणे.

 परंतु एके दिवशी तो घडा फुटला. त्याचे तीन तुकडे झाले. जणू मनूचे प्राणच गेले. त्या तीन तुकड्यांत त्याचे त्रिभुवन होते. त्या तुकड्यांकडे तो पाहात राहिला. इतके दिवस तो घडा त्याच्यासाठी

एकाकी मनू * ११