पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/47

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     प्रकरण दुसरें.     ४५

असल्या प्रकारच्या शब्दांपैकी प्रत्येक शब्द प्रथम एकच मनुष्य प्रचारांत आणतो व त्यामुळे सर्व मनुष्यांच्या मनाची प्रवृत्ति वाईटाकडे आहे असे म्हणतां यावयाचें नाहीं. परंतु एकाद्या विशिष्ट व्यक्तीनें तो शब्द प्रथम प्रचारांत आणलेला असला तरी सर्व लोकांनी त्याचा स्वीकार करणे, संभाषणांत त्याचा उपयोग करणे, त्याच्या उपयोगाविषयीं मनांत किंतु न बाळगणे, वगैरे गोष्टींवरून प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा ठसा त्या शब्दांत उमटलेला असतो, असे म्हणण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं. असो; तर ह्या निंद्य स्वभावामुळे जे शब्द अवनत झालेले आहेत, ते शब्द पहिल्या वर्गात येतात. दारू इत्यादि शब्द या प्रकारचे आहेत.

 १२. दारू.-ह्या शब्दाचा अर्थविपर्यास मनांत आणला म्हणजे मनुष्याच्या मनाचा कल स्वत:ची वाईट व्यसने छपविण्याकडे व दुसऱ्याची प्रकाशांत ओढून आणण्याकडे किती जोराचा असतो, हे आपणांस समजेल. दारू हा फारसी शब्द असून त्याचा त्या भाषेत औषध असा अर्थ आहे. मद्यप्राशन करणारे लोक आपलें व्यसन छपविण्यासाठी मद्यावर औषधाचे पांघरूण घालतात. हल्लीं ज्याप्रमाणे मद्यपी लोक रस्तोरस्ती दिसणाऱ्या दवाखान्यांपैकी एकाद्या दवाखान्यांत सुळूकदिनी शिरून मद्याचा ‘डोस' झोंकून येतात, व कोणी त्यांस आंत शिरतांना व बाहेर येतांना पाहिलेच आणि प्रश्न केलाच तर कांहीं ‘मेडिसिन' घ्यावयास गेलो होतों, असें उत्तर ठोकून देतात, त्याप्रमाणे पूर्वी मुसलमानी राज्याचे वेळीं मद्यपी लोक हकिमाचे दुकान जाऊन मद्याचा घोट झोंकून येऊन मी दारू प्यावयास गेलो होतो, असे उत्तर देत असत. परंतु मद्यपी लोकांची ही लबाडी लोकांस लवकरच कळून येऊन दारू