पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/92

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

खूण केली. नंतर त्या तऱ्याने हत्तीला होडीच्या बाहेर काढले. मग त्याच रेघेपर्यंत होडी पाण्यात बुडेतोंपर्यंत मोठमोठे धोंडे तिच्या आंत घातले. मग धोंड्यांची वेगळी वेगळीं वजने एकत्र करून हेच वजन हत्तीचे आहे असे त्याने बादशाहास सांगितले. त्याची समयसूचकता व कल्पनाशक्ति पाहून बादशाहा इतका खुष झाला की, त्याने त्याला व त्याच्या वंशजांना तो गांव इनाम दिला व त्या गांवाचे जुने नांव रद्द करून त्याचे " तुळापूर " असे नवीन नांव ठेविलें.

 कित्येक स्थळांच्या नांवांत लोकांची भ्रमात्मक कल्पना दृष्टीस पडते. हल्लींचा मद्रास हा प्रांत पुराणप्रसिद्ध शल्य राजाचा देश आहे असा वर्णसादृश्यावरून लोकांचा भ्रम होऊन त्यास मद्रदेश असे नांव दिले जाते आणि इतकेंच नव्हे तर " पुराणप्रसिद्ध मद्रदेश” किंवा “शल्याच्या राजधानीचे स्थळ" असेही प्रयोग कधी कधी वर्तमानपत्रांत दृष्टीस पडतात; परंतु भरतखंडाचा प्राचीन इतिहास ज्यास अवगत आहे, त्यास ही लोकांची चुकी सहज समजण्याजोगी आहे.

 चाणक्षः- आतां वृत्तगर्भ शब्दांची कांहीं संकीर्ण उदाहरणे देतों. चाणक्ष ( धूर्त ) हा शब्द नंदराजे व मौर्य यांच्या मधील युद्धाचे स्मरण करून देतो. चाणक्य हा मौर्याच्या पक्षाचा मंत्री असून त्याने नंदवंशीयांचा वरचष्मा कसा मोडला व प्रतिपक्षीयांचा मंत्री जो राक्षस त्यास आपल्या पक्षास कसे अनुकूळ करून घेतलें, हें मुद्राराक्षस नाटकांत वर्णिलेले वाचकांस स्मरत असेल. रांठ–राठ हा शब्द आपणांस महाराष्ट्रांत पूर्वी ज्या रट्ठ लोकांनी राज्य केले त्या लोकांचा कणखरपणा व सोशिकपणा ह्या गुणांची आठ-