पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०३

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

स्त्रीबीजाला मिळालं तर पुरुषबीज स्त्रीबीजाला भोक पाडून आत शिरतं वस्त्रीबीज फलित होतं. फलित झालेलं बीज स्त्रीबीजवाहिनीतून गर्भाशयाकडे सरकू लागतं. गर्भाशयाकडे जाताना त्या फलित बीजाचं विभाजन होऊन एकाचे दोन, दोनाच्या चार अशा पेशी वाढायला लागतात. गर्भाशयात पोहोचल्यावर या पेशींचा गोळा गर्भाशयात रुजतो व तिथे वाढू लागतो. काही जोडप्यांना गर्भधारणा होण्यास कमी काळ लागतो, तर काहींना काही महिने किंवा वर्षही लागू शकतात. लग्न झाल्याझाल्या २-४ महिन्यांत गर्भधारणा झाली पाहिजे अशी काहीजणांची धारणा असते. डॉ. सनत पिंपळखरे म्हणाले, "काही जोडपी वाट बघायला तयार असतात पण काहीजण, विशेषत: जे कमी आर्थिक स्तरातून येतात त्यांना खूप घाई असते. बायको लगेच गर्भार झाली पाहिजे याचा सासू-सासरे व इतरांकडून खूप दबाव असतो. त्यांना सगळं झटपट झालं पाहिजे असा उतावीळपणा असतो." गर्भधारणा होण्यास सरासरी दीड वर्ष लागू शकतं. जर दीड वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा झाली नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्या दिवसात संभोग केला तर गर्भधारणा होण्याची जास्त शक्यता असते? एक उदाहरण घेऊन समजून घेऊ. समजा, एका स्त्रीची पाळी १ तारखेला सुरू झाली तर अंदाजे १४ व्या दिवशी दुसरं स्त्रीबीज परिपक्व होतं व स्त्रीबीजवाहिनीत येतं. परिपक्व स्त्रीबीज अंदाजे १ दिवस जिवंत राहतं. जर लिंग-योनीमैथुन झाला तर पुरुषाचं एखादं बीज स्त्रीबीजाला मिळण्याची शक्यता असते. वीर्यपतन झाल्यावर गर्भधारणेची शक्यता गर्भधारणेची शक्यता कमी २८ चा दिवस १ते ५ दिवस (मासिक पाळी) विशिष्ट पेशीचा थर भाशयातील २१ वा दिवस ७वा दिवस ९वा दिवस १९ वा दिवस १४ वा दिवस गर्भधारणेची शक्यता अधिक मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १८९