पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२१९

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

गोळ्या घेण्याची पद्धत ही पद्धत समजून सांगण्यासाठी माला-डी' चं उदाहरण घेऊ. 'माला-डी' च्या एका पाकिटात २८ गोळ्या असतात. (२८ दिवसांचं मासिक पाळीचं चक्र गृहीत धरून). 'माला-डी' ही गोळी पाळी सुरू झाल्यावर पाचव्या दिवसापासून घ्यायला सुरू करायची. पाकिटाच्या मागे, गोळी घ्यायला कुठून सुरुवात करायची, याचे बाण दाखवलेले असतात. संभोग होवो अथवा न होवो, दररोज एक गोळी घ्यायची. शक्यतो सकाळी नाष्ट्याबरोबर घ्यावी म्हणजे विसरायची शक्यता नसते. पहिल्या २१ दिवसांच्या गोळ्या पांढऱ्या असतात. शेवटच्या आठवड्याच्या गोळ्या काळ्या असतात. या काळ्या गोळ्यांमध्ये लोह असतं. या काळ्या गोळ्या सुरू केल्या, की अंदाजे दोन दिवसांत पाळी येते. पाळी सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी नवीन पाकिटातील पांढऱ्या गोळ्यांपासून सुरुवात करायची. जर काही कामानिमित्त मासिक पाळी पुढे ढकलायची असेल, तर काळ्या गोळ्या न घेता नवीन पाकिटातील पांढरी गोळी (दररोज एक) घेणं चालू ठेवायचं. आपलं काम संपलं व मध्ये दोन दिवस पांढरी गोळी घेतली नाही की पाळी येते. तांबी (कॉपर-टी) तांबी एक उपकरण आहे. प्लॅस्टिकच्या 'T' आकाराच्या उभ्या काडीच्या भागाला गुंडाळलेली एक तांब्याची तार असते. तिच्या उभ्या दांडीच्या टोकाला दोन धागे असतात. तांबी गर्भाशयात बसवायची असते. संभोग होऊन स्त्रीबीज व पुरुषबीज फलित झालं तरी त्या फलित बीजाला तांबी गर्भाशयात रुजू देत नाही. ती बसवायला किंवा काढायला शस्त्रक्रियेची जरूर नसते पण ती बसवायला/काढायला डॉक्टर किंवा नर्स लागते. तांबी बसवल्यावर तिचे धागे योनीत उतरतात. आठवड्यातून एकदा स्त्रीनं साबणाने स्वच्छ हात धुवून योनीत बोट घालून आपल्या तांबीचे धागे हाताला लागतात का हे तपासून बघावं. जर धागे हाताला मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २०५