पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२०

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

लागले नाहीत तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पुरुषाचं उत्तेजित लिंग मोठ असेल तर संभोगाच्या वेळी हे धागे लिंगाला लागू शकतात. तांबीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. प्रकारानुसार एक तांबी किती वर्ष गर्भाशयात ठेवता येते हे ठरतं. तिचा कालावधी संपला की ती डॉक्टर/नर्सच्या मदतीने काढून टाकावी. मूल हवं असेल तेव्हा बसवलेली तांबी काढून टाकावी. तांबी बसवल्यावर काहीजणींना मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्त जाऊ शकतं, ओटीपोटात कळा येऊ शकतात. क्वचित वेळा तांबी बसवल्यावर इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून तांबी बसवल्यावर जर सातत्याने जास्त रक्तस्राव दिसू लागला, पाठीत, ओटीपोटात दुखू लागलं, तांबी बसवल्यानंतर दोन आठवड्यांत थंडी-ताप भरून आला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. क्वचित वेळा तांबी गर्भाशयमुखातून खाली उतरू शकते. तसं झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तांबी बसवल्यावर ‘एक्टोपीक' गर्भधारणेची शक्यता काही अंशांनी वाढते. तांबी बसवल्यावर जर मासिक पाळी चुकली तर डॉक्टरांकडून पाळी चुकण्याच्या कारणाचं लगेच निदान करावं. ज्या स्त्रीचं एकही बाळंतपण झालेलं नाही तिने तांबीचा वापर करू नये. स्परमिसाईड (उदा.'टुडे') या गोळ्यांत पुरुषबीजांना मारणारं रसायन असतं. (उदा. नोनॉक्सिनॉल-९). अंदाजे १५ मिनिटं प्रत्येक संभोगाअगोदर एक गोळी योनीमध्ये घालून ठेवायची. जेवढी गोळी योनीच्या आतवर घालता येईल तेवढी घालावी. गोळीचा परिणाम अंदाजे एक तासभरासाठी राहतो. शरीराच्या उबेनं ही गोळी विरघळते. पुरुषाचं योनीत वीर्यपतन झालं की या गोळीतलं रसायन पुरुषबीजांचा नाश करतं. या रसायनाचा काही स्त्रियांना/पुरुषांना त्रास होतो. योनीला/लिंगाला खाज सुटणं, जळजळ होणं असे परिणाम दिसू शकतात. या गोळीचा 'फेल्युअर रेट' (म्हणजे २०६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख