पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/101

हे पान प्रमाणित केलेले आहे.




तिलक नांवांतील जादू

मध्येंंही ' मराठा लाइन' हें नांव बरींच वर्षें उपयोगांत आणलें जाईल. केवळ पांच महिन्यांपूर्वीच बगदादची मराठी पलटण परत स्वदेशीं नेण्यांत आली. त्यांच्या छावणीच्या स्थलाचा निर्देश ' मराठी लाइन ' या नामाभिधानानेच होत आहे व पुढेही होत राहील हें खास ! बगदाद शहरीं प्रथमतः पाऊल टाकतांच तेथील हिंदी असोसिएशनमध्ये चौकशीसाठी गेल्यावर घडलेला प्रसंग स्मृतिफलकावरून जाईल असें वाटत नाही ! मी 'केसरी'चा प्रतिनिधी असें कळतांच तेथील उपस्थित मंडळींनी ' लो. टिळकांच्या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी इराकमध्ये कसा येऊं शकला ? ' याविषयी आश्चर्य प्रगट केलें. एकदोघांच्या मनांत केसरी-टिळक-देशसेवा–खडतर आयुःक्रम–कारागृहवास-या विचारांची शृंखला विद्युद्वेगाने उद्भवली आणि तिंचे चित्र त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंत पहावयास मिळालें ! पन्नास वर्षांपूर्वी ' तिलक' हा शब्द कितीदा उच्चारला तरी हृदयांत कांहीही भावना उचंबळत नसत. आजच्या पिढींत हिंदुस्थानांतच नव्हे तर प्रत्येक जिवंत राष्ट्रांत ' तिलक' या तीन अक्षरी मंत्रनादाने अंतश्चक्षुपुढे कोणते विचार खेळतात हें सांगण्याची आवश्यकता दिसत नाही ! तैग्रीस नदीच्या काठीं पाण्याचा मुळीच दुष्काळ नसला तरी हिंदी हृदयोद्भव व नेत्रांवाटे बाहेर पडलेल्या दोनच जलबिंदूंना अमोलिक महत्त्व आहे खरें !

 ब्रिटिशांचें हिंदुस्थानांतील राज्य म्हणजे वचनभंगाची परंपरा होय असें एका राजकारणपटूने वर्णन केलें आहे. इराकमध्ये हिंदी कामगार वर्गास नेऊन महायुद्धाच्या बिकट प्रसंगीं ब्रिटिश सरकारने त्यांच्या कडून जिवापाड श्रम करवून घेतले ही गोष्ट सर्वांना माहीत आहेच. पण त्यापुढील परिस्थिति उपर्युक्त वर्णनाप्रमाणेंच घडलेली दिसते. जिवावर बेतली असतां अनेक आशा दाखवून हिंदुस्थानांतून हरकार्यो-

९५