पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/144

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पण लष्करी खात्यांतील अरबी शब्दांना इराणी प्रतिशब्द योजून त्यांचा प्रचार करणें, हसन, महमद इत्यादि अरबी नांवांवर बहिष्कार घालून, रुस्तुम, जमशीर वगैरे इराणी नांवांचा प्रसार जनतेंत सक्तीने करणें या बाबी महत्त्वाच्या असून त्यांपासून पुष्कळच घेण्यासारखें आहे. 'नांवांत काय आहे ?' असा कोणीं प्रश्न केल्यास नांवांतच सर्व आहे असें स्पष्टपणें सांगावें लागेल. इराणी तारीख, महिने आणि वर्ष निराळें, अरबी कालमान अगदी वेगळें आणि ख्रिस्ती शकाचा तृतीय पंथ आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी आवश्यक असल्याने नेहमी त्रिवेणीसंगमाचें पंचांग जवळ बाळगावें लागतें. नांवांच्या व भाषेच्या शुद्धीकरणाच्या आणि नवीन वर्षमानाच्या सुधारणा केवळ राजाश्रयाच्या जोरावरच इतक्या त्वरेने लोकमान्य झाल्या हें लक्षांत ठेवणें इष्ट आहे. इंग्रजी महिन्यांच्या तारखाही कांही तरी अनुमानधक्क्यानेच ठरविल्या आहेत. आणि अमुक महिना किती दिवसांचा हें ठरविण्यासाठी हातावरील उंचवट्याचे सहाय्य घ्यावें लागतें. त्यांचे दिवस हे कसे तरी ठरविलेले आहेत, पण इराणी वर्षमानांत पहिले सहा महिने एकतीस दिवसांचे, पुढील पांच महिन्यांत तीस दिवस आणि शेवटचा महिना एकोणतीस दिवसांचा अशी सोईची विभागणी आहे. दर चार वर्षांनी अखेरचाही महिना तीस दिवसांचा असतो. ही सोय नाही असें कोण म्हणेल ? पण ती केवळ इराणांतच मान्य आहे.

  दैनिक कार्यक्रम जसा आपला तसाच इराण्यांचाही. फरक केवळ घड्याळ लावण्याचा. सूर्योदयाला साधारणपणे सहा वाजतात असें आपण मानले तर इकडे त्यावेळी घड्याळांत बारांचे ठोके पडतील. म्हणजे सूर्योदयच बारा वाजतां होतो! इराकांतही तीच पद्धति

१३८