पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/145

हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिनमानांतील फरक

असल्याने 'इंग्रजी घड्याळ' का 'इराणी घड्याळ'? असा प्रश्न केव्हाही विचारावा लागतो. इराकांत अरबी वेळ पुष्कळ ठिकाणी मानतात तसें इराणचें नाही. मुंबईचा जसा घड्याळाचा वाद आहे, तसाच हा समजावा. मुंबईस फरक सुमारें चाळीस मिनिटांचा असतो तर हा सहा तासांचा आहे इतकेंच! आपण घटिकामापन सूर्योदयापासून करतों, तशापैकीच घड्याळाचे तास सूर्योदयापासून मोजण्याची रीत आहे. विशेष आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नव्हे.
 मुसलमान म्हटला की, त्याला दाढी हवी, ही समजूत इराणांत पार बदलली आहे. धर्मोपदेशक आणि क्वचित् एखादा इसम दाढीवाला आढळतो. बाकी सर्वांना 'नित्य श्मश्रू अभिमत' असलेली दिसते! मिशीकर्तनांत 'फ्रेंच कट' म्हणून एक प्रकार फॅशनचे जनक मानतात. त्याचा प्रसार इराणांत पुष्कळ झालेला आहे असें स्पष्ट दिसून येतें. अधरोष्ठाच्या सीमेंतच मिशांना ठेवणे हा मुख्य नियम 'फ्रेंच कटा'चा आहे. बहुधा मिशांचें माप या मताचे लोक नाकाच्या रुंदीवरून ठरवितात. नाकाच्या रुंदीइतक्या मिशा असल्यास प्रत्यवाय नाही. त्यांची किमान मर्यादाही नाकांतील मधल्या पडद्याच्या जाडीइतकी आहे. अशा पद्धतीचा अवलंब इराण्यांनी केला. यावरून फ्रेंचांचा वरचष्मा येथे किती आहे तें कळून येईल. सुगंधी द्रव्यांतही फ्रान्समधील दुकानदारांनाच प्राधान्य असल्याने फ्रेंच अत्तरें, लव्हेंडरें वगैरे केशभूषेचें साहित्य पुष्कळच खपतें. सर्वच बाबतींत फ्रेंचांचे अनुकरण इराण्यांनी केलें आहे असें म्हणतां येतें.

  इराणांत फ्रेंच संस्कृतीचा, चालीरीतींचा आणि भाषेचा पगडा अत्यंत आहे. याचे कारण नेपोलियनच्या कालापर्यंत जाऊन भिडतें. नेपोलियनच्या अनेक महत्त्वाकांक्षांपैकी हिंदुस्थानला येणें-नव्हे जिंकणें

१३९