पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/153

हे पान प्रमाणित केलेले आहे.



सहजासजी घडलेलें सहभोजन



त्याव्यतिरिक्त कोणतेही पदार्थ मी घेतले नाहीत.भाजी नेहमीच सामिष असे आणि मी पडलों शाकाहारी ! तेव्हा निरामिष पदार्थ मिळतील तेवढेच घ्यावयाचे. नूनचे प्रकार इराणांत फार आहेत. हत्तीसाठी लागणाच्या जाड रोटांपासून ते कागदाप्रमाणे पातळ पोळ्यांपर्यंतचे सर्व प्रकार मिळू शकतात. आकारांतही त्यांची विविधता असे. हातांत रोटी घेऊन चार पांच जणांचे मिळून एक दह्याचे भांडे असे, त्यांतील दही सर्वांनी मिळून सहभोजनाप्रमाणे घ्यावयाचे ही रीत आहे. या प्रचाराविरुद्ध जाणे म्हणजे मुसलमान नसल्याची ती कबुलीच होय! तेव्हा, येईल तो आपला धाकटा भाऊ समजून अक्षरश: एका ताटांत पांच सहा जण जेवत असूं.

 स्वच्छतेच्या बाबतीत बरेच नियमोल्लंघन घडलें. रोजचें स्नान साप्ताहिकांत येऊन पडल्याचे लिहिलेच आहे. पण त्याच्याही पलीकडील बाब म्हणजे पेय पाण्याची. पाणी कोठे मिळेल तेथे तें उंटाप्रमाणे पोटांत भरून घ्यावयाचें हाच प्रघात सर्व प्रवासांत पाळावा लागला. जवळ पाणी बाळगलें असतें तर असा प्रसंग आला नसता असें जर कोणास वाटेल तर ते चुकीचें आहे. कारण इतर उतारू तुमच्या कळत वा न कळत त्या भांड्याला तोंड लावून त्याला केव्हाच शुद्ध करून ठेवीत! प्रत्येकाच्या बरोबर मातीचा खुजा पाण्यासाठी असे. पण पिण्याचे भांडें एकही नव्हतें. जरूर पडेल तेव्हा बिनदिक्कतपणे खुजा तोंडाला लावला की झाले. भांड्याची आवश्यकता उरते कोठे ? बाजारांतील रोट्या विकत घ्यावयाच्या त्या तरी शुद्ध असाव्यात. पण मला वाटते एखाद्या सार्वजनिक वाचनालयांतील दैनिक पत्रांना हात लागत नसतील इतके हात भाकरी पोटांत जाण्यापूर्वी तिला लागत असत.पुण्यातल्या मंडईत्तज्या फळांनाही देखील वाटेल

१४७