पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/155

हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंदुस्थानांतून लुटलेलें जवाहिर

म्हणतो. एके ठिकाणी तर "भर पेला–आजचा हा दिवस गतकालाच्या ढिगांत जाऊन पडण्यापूर्वी मला मदिरेचें आकंठ सेवन करू दे," असे स्पष्ट शब्दांत तो सांगतो.
 दमगावापासून रस्ता जरा बरा होता. म्हणजे पूर्वीच्या त्या मार्गावरून मोटारींची वाहतुक असल्याने तो रस्ता झाला होता की, सडक आहे म्हणून यंत्रयानें जा ये करूं लागली, हे निश्चितपणे सांगता येत नसे. पण पुढील रस्ता कोणाच्या तरी मालकीचा आहे आणि तो कधी तरी दुरुस्त करावा लागतो अशी जाणीव झाल्याचीं चिन्हें दिसत!

  मोठमोठे चढउतार, नद्यानाले इत्यादिकांना ओलांडून मशहदला आलो. तेथील लोकांची गर्दी, व्यापार, मोटारींची वाहतुक पाहूनच त्या शहराच्या महत्त्वाची कल्पना आली ! अफगाणिस्तान, बलुचिस्तान, आणि रशियन तुर्कस्तान यांनी वेढलेला हा इराणचा भाग ‘खुरासान' म्हणून ओळखला जातो आणि त्या प्रांताची राजधानी मशहद येथे आहे. खुद्द मशहदलाही खुरासान असें म्हणतात. तेहरान, कंदाहार, पेशावर या मार्गांनी लुटारूंच्या ज्या स्वाऱ्या हिंदुस्थानवर झाल्या त्यांच्याच मार्गात मशहद आहे. गतकालांत हिंदुस्थानांतील किती अलोट संपत्ति लुटली गेली आहे याचें स्पष्ट प्रदर्शन आजमितीसही मशहद येथीलं मशिदींत पहावयास मिळतें. तेथील मनोरे व घुमट एवढेच सुवर्णाने मढविलेले नसून आंतील भागही रत्नें, माणकें इत्यादि मौल्यवान् जवाहिरांनी सोन्याच्या कोंदणांत बसवून शोभिवंत केला आहे! आणि इराणांत बर्फ पुष्कळ पडतें किंवा बदाम, पिस्ते, द्राक्षें विपुल आहेत एवढ्यावरून तीं रत्नें तेथेच पैदा झाली असें नव्हे. खनिज संपत्ति आहे, ती सर्व पृथ्वीच्या पोटांत असल्याने इराणांतील सर्व जडजवाहिर हे जवळच्या हिंदुस्थानांतून चोरून लुटूनच आणलेलें

१४९