पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/16

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

म्हणजे राघो भरारीची अर्ध्या दिवसाची मजल आहे. सिंधुनद पार होण्यास एकच मार्ग त्या काळीं उपलब्ध होता आणि तो किल्ल्याच्या पायथ्याशीं असे; म्हणजे नाकेबंदी कशी पूर्ण होई हें ध्यानांत येईल. या किल्ल्यांत आजमितीसही ब्रिटिशांनी तोफा व पलटण ठेवून त्याचे महत्त्व ओळखलें आहे.
  ह्या किल्लयांत अर्थातच मराठ्यांच्या पराक्रमाचें कांहीच अवशिष्ट स्मारक नाही. पेशावरच्या रस्त्यावर ब्रिटिश सैन्याने केलेल्या बारीकसारीक कामगिरीचे वर्णन शिलांकित करून लहानसे का होईना पण स्मारक केलेलें आढळतें. पण या जगड्ड्याळ पराक्रमाचा कांही मागमूसही लागत नाही ! सरकारी गॅझेटिअरमध्ये अकबराने हा किल्ला बांधतांना कोणत्या लोकांना बळी दिले त्यांची नांवें किंवा ब्रिटिशांनी किल्ला घेतांना कामास आलेल्या क्षुल्लक अधिकाऱ्यांच्या पराक्रमाचें (?) वर्णन सांपडतें; परंतु मराठ्यांनी हा किल्ला पंधराशें मैलांची मजल मारून हस्तगत केला या पराक्रमाचा निर्देशही नसावा काय?

 ह्या किल्याच्या पायथ्याला जी वस्ती आहे ती बहुधा मुसलमानांचीच आहे आणि त्यांच्या मशिदी वगैरे धार्मिक स्थानेंही तेथे आहेत. त्यांच्या बाजूस एक शिवालय जीर्णोद्धरित असून, अटकेंंत असलेलेंं हिंदु मंदिर काय तेंं एकच ! तेथे कदाचित् मराठ्यांच्या पराक्रमाची खूण सापडेल या आशेने जावे तर वेगळाच इतिहास कळतो. किल्ला बांधला अकबराने हे खरं, पण त्याच्या बरोबर मानसिंग, तोडरमल, बिरबल ( ? ) इत्यादि हिंदु मंडळी असल्याने त्यांनी आपल्या पूजेसाठी शिवमंदिरही बांधविलें, तेंं किल्ल्याच्या अगदी द्वारासमीप होते. परंतु मध्यंतरीच्या काळांत काय झालें कोणास ठाऊक, देवालयाच्या इतर भागाचा विध्वंस होऊन तेथे सर्व मुसलमानी वस्ती आली आणि

१०