पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/178

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

नामी रचना पहातांच तें हिंदुस्थानांतील असल्याची खात्री पटते. ज्या दालनांत हें सिंहासन आहे, तेथे हिंदुस्थानांतील इतर लूटही ठेवली आहे. हस्तिदंती मूर्ति, पंखे, इतर कोरीव वस्तु, सुवर्णमूर्ति, जरतारी व किनखापी कापड ह्यांचे आगर हिंदुस्थानच असल्यानें त्या दुसरीकडून आल्या असतील असें संभवत नाही.
 एवढे सिंहासन पहावें की, इतके कष्ट सोसून प्रवास अंगीकृत केल्याचें श्रेय मिळालें असें वाटतें. एक तर आपलेपणामुळे त्या सिंहासनाला महत्त्व; आणि दुसरे असे की, एकसमयावच्छेदे इतका मूल्यवान रत्नसंग्रह योग्य कोंदणासह उपयोगांत आणलेला अन्यत्र कोठे दिसणार?

 'तख्त-इ-नादिर'च्या बाबतींत बऱ्याच प्रवासी लेखकांची फसगत झालेली आहे असे दिसते. इराण्यांना मोराची आवड विशेष असल्याने आणि मोर म्हणजे वैभवनिदर्शक मानण्याची त्यांची रीत असल्याने इराणांत इस्फहान येथे तयार करविलेल्या सिंहासनाला ते 'तख्त-इ-ताऊस' म्हणूं लागले; व समजुतीखातर दोन 'मोर' त्यांनी कसे लावून घेतले आहेत हें वर सांगितलेंच. नादिरखानाने हिंदुस्थानांतून आणिलेले सिंहासन हे 'मयूरासन' याच नांवाने प्रसिद्ध होतें. तेव्हा तेहरान नगरींत आल्यानंतर या दोन्ही एकाच नांवाच्या राजासनांचा घोटाळा उडून बहुतेक इंग्रजी लेखकांनी 'तख्त-इ-ताऊस'चे वर्णन करून जडजवाहिरांचे लेणे कल्पनेने चढविलेले दिसते ! इतकेच काय, पण नुकतेच ' रत्नाकरां'तून पृथ्वीप्रदक्षिणे'साठी निघालेले श्री. माटे यांचीही या सिंहासनांनी फसगत केली असें दिसतें. त्यांना त्या ठिकाणी 'मोर व सिंह' दिसले. याचें कारण असें की, हें पदार्थसंग्रहालय पहाण्याची सहसा कोणास पवानगी नसते; आणि शहरांतील पोराबाळांना सुद्धा 'तख्त-इ-ताऊस'चे वर्णन ‘तोंडपाठ'

१७२