पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/181

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मयूरपिसांची चैन

आहे. याशिवाय नादिरशहाने हिंदुस्थानवर स्वारी केल्या वेळी दिल्लींत काय देखावा आढळला, वाटेंत लोक कसे शरण आले किंवा त्याने कत्तल कशी केली इत्यादि महत्त्वाच्या प्रसंगांची चित्रे काढलेलीं जुन्या संग्रहालयांत दिसली. पूर्वीच्या कांही शहांची मोठमोठीं रंगीत चित्रेंही होतीं.
  असो. इराणांतील हे वैभव मुख्यत्वे हिंदुस्थानांतलेच असल्याने पुनः ते परत स्वस्थानीं येईल काय याच विचारांत मी मग्न राहून राजवाड्यांतील प्रेक्षणीय भागांचें निरीक्षण संपविलें! इतर रत्नभांडार मोठें व मूल्यवान् आहे; पण तें खुद्द रेझाशहाच्या मालकीचें असून कोणासच पहावयास मिळत नाही. मग त्यांत काय काय चिजा आहेत याचे केवळ 'ऐकीव' वर्णन कशाला?

—लोकशिक्षण, ऑक्टोबर, १९२९.
 

परिशिष्ट दुसरें : इराणांतील अनुभव

  "मोराच्या पिसांची चैन करावयाची असेल तर हिंदुस्थानांत जाण्याची धमक अंगीं असली पाहिजे," या अर्थाची एक इराणी म्हण फार लोकप्रिय आहे. 'हिंदुस्थानांत जाणें' म्हणजे इराण्यांच्या दृष्टीने अटकेला झेंडा लावण्यासारखेंच आहे. मराठी भाषेंत अटक जशी पराक्रमाची सीमा मानली जाते तसेंच इराणांतही हिंदुस्थान म्हणजे ध्येयाचें परमोच्च शिखर मानतात. आणखी एक अर्थ त्या वाक्प्रचारांत अभिप्रेत आहे. 'मोराची पिसे' ही चैनीची बाब असें इराणी समजतात. आपल्याकडील फकीर किंवा 'बाळसंतोष' मयूरपिच्छांनी मढलेले असतात. याचें कारण आपण त्या पिसांना अति-

१७५