पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/19

हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंदुस्थानचे द्वारपाळ

अखिल हिंदु जातीचा आहे हें लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्या वेळीं मुसलमानांच्या वाढत्या लुटारूपणास आळा घातला तो राघोबांच्या या थोर कृत्यानेच! तेव्हा हें स्मारक अखिल हिंदुमात्राकडून झाले पाहिजे !
  अटकेला उत्सव करण्यास जावें आणि घरोघर भगव्या झेंड्याच्याच गुढ्या उभाराव्या अशी सूचना कित्येकांनी केली आहे. ती या वर्षापासून अमलात आणावी आणि हरप्रयत्नेकरून अटकेस चिरकालीन स्मारकाची व्यवस्था व योजना करण्याच्या खटपटीस लागावें अशी आग्रहाची सूचना आहे.

–केसरी, ता. २५ डिसेंबर, १९२८.


( ३ )

  वायव्यसरहद्दीवरील परिस्थिति-वायव्यसीमाप्रांताचें संरक्षण करण्यासाठी विशेष लष्करी खर्च येतो तो का, याचे थोडक्यांत विवेचन आज करावयाचें आहे. वायव्यसरहद्दीचा प्रांत पूर्वी पंजाब इलाख्याचाच एक भाग होता. परंतु, तेथील अनेक भानगडी महत्त्वाच्या असल्याने खुद्द व्हाइसरॉयसाहेबांनीच तिकडे लक्ष पुरविणे आवश्यक होते, म्हणून लॉर्ड कर्झन यांनी १९०१ मध्ये हा वेगळाच प्रांत निर्माण केला. हजारा, पेशावर, कोहाट, बन्नू व डेराइस्माईलखान हे पांच जिल्हे मिळून हा प्रांत होतो. येथील सर्वाधिकार चीफ कमिशनर यांचेकडे असून त्यांचा संबंध दिल्ली येथील मध्यवर्ती सरकारशीं येतो. अफगाणिस्तानची सरहद्द याच प्रांताला अगदी लागून असल्याने हिंदुस्थानचें संरक्षण करण्याची जबाबदारी चीफ कमिशनरवर पडते; आणि लष्करी महत्त्वाचे कारणही हेंच ! पेशावर

१३