पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/191

हे पान प्रमाणित केलेले आहे.

चहा नको तर दारू

सर्वांना नादमाधुर्यामुळे ती आवडली असें दिसले. 'बजगो' 'बजगो' म्हणजे काय ? तें पुनः म्हणा, अशी त्यांची विनंती होऊं लागली की, दुसराच कोठला तरी संस्कृत श्लोक म्हणावा असा क्रम आठ दहा दिवस चालू होता. गोपाळ, गोविंद ही नांवें कोणाची होती हें त्या धर्मप्रेमी मुसलमानांना कळलें नाही व त्या पद्याचा अर्थ कळण्याइतके ते शहाणे नव्हते, म्हणूनच त्या समुदायांत चर्पटपंजरी म्हणण्याचें धारिष्ट झालें.

  *
*
  • *

 बुद्धिबळाचा खेळ इराणांत विशेष खेळतात. त्याला 'शत्रंज' (चतुरंग या संस्कृत शब्दाचे विकृत स्वरूप) असें म्हणतात. बहुतेक सुशिक्षितांस हा खेळ हिंदुस्थानांतून आल्याचे ठाऊक आहे. व 'शत्रंज' हें नांवही संस्कृत शब्दापासून झालेलें असल्याचें आमच्या शाळेंत सांगितलें असें ते म्हणतात. पण 'शत्रंज' खेळणे हे अक्ष, पान, मृगया इत्यादि व्यसनांपैकी गणलें असून धार्मिक लोक त्याकडे क्षुद्र दृष्टीनेच पहात असतात. मक्केला जाणाऱ्या एका यात्रेकरूला मी विचारलें की, "कायहो, तुम्ही 'शत्रंज' नाही का खेळत?" यावर तो उत्तरला,"छे! छे! भलतेच काय बोलतां? आम्ही आता मक्केला ना निघालों? मग शत्रंजला शिवावयाचें देखील नाही. मक्केला जाणाऱ्याने 'शत्रंज'बाजी करावयाची नसते. तो xxx गृहस्थ पक्का शत्रंजबाज आहे बरें!"

  *
*
  • *

 एका इराणी डॉक्टरने मला आपल्या घरी भोजनास बोलाविलें होतें. नित्य प्रचाराप्रमाणे त्यांनी गेल्याबरोबर (बिनदुधाचा) चहा आणला, मी घेत नसल्याचें सांगून आदरपूर्वक तो नाकारल्यावर ते म्हणाले, "मग काय, द्राक्षरस (साधी दारू) मागवूं का?"

१८५