पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/25

हे पान प्रमाणित केलेले आहे.

नीत्शेच्या ‘नरश्रेष्ठा’चा नमुना

अफगाणिस्तानशीं हिंदुस्थान सरकारचें युद्ध चालू होतें. तेव्हा या वजिरी पुंडांना फार जोर चढला आणि एका वर्षांत सरहद्दीवर
  ६११ लहानमोठे दरवडे पडले
  २९८ इसम मारले गेले
  ३९२ ,, जखमी झाले
  ४६३ ब्रिटिश प्रजाजनांना पळवून नेलें
  ३० लाख रुपयांची मालमत्ता लुटली गेली !!
  वजिरांची वृत्तीच अशी आहे कीं, त्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रति चार वर्षांनी ब्रिटिशांना त्यांच्याशी लढाई चालू करावी लागत असे. केलेले दंड थकले, किंवा अशाच कांही अक्षम्य अपराधांसाठी वजिरी लोकांवर हल्ला करावयाचा, तर विमानांतून बाँब फेकून त्यांना जेरीस आणावयाचें आणि ते शरण (?) आले की, पुन: सलोख्याने रहावयाचें, अशी रीत आज किती तरी वर्षे चालू आहे. इ. स. १८५२ पासून आजपर्यंत १७ वेळां ब्रिटिशांना वजिरांशी लढावे लागलें! अशा नाठाळांशी गांठ असल्याने वजिरिस्तानांत ठेवावयाची फौज अगदी चलाख, शूर आणि विश्वासाची ठेवावी लागते.

  या सरहद्दीवरील सर्व जातींना 'अफगाण' अशी सर्वव्यापी संज्ञा दिली जाते. त्या सर्वात सामान्य असे गुण पुष्कळच आहेत. मनोविकासाचा अभ्यास करणारांस हें एक मासलेवाईक निसर्गसिद्ध मन अभ्यासावयास मिळेल. नीत्शे म्हणून जर्मन तत्त्वज्ञ होऊन गेला; त्याने नरश्रेष्ठाची महति सांगून त्याची योग्यता ठरविण्याचे साधनही आपल्या पुस्तकांत दिलें आहे. ' डोळ्यांतून टिपूसही न गाळतां किंवा हृदयावर कोणत्याही भावनेचा पारणाम न होऊं देतां मनुष्यजातीवर प्रहार करणें' ही शक्ति जितक्या जास्त प्रमाणांत असेल

१९