पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/40

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पाठवून तुमच्याकरितां परवानगी मिळवू. पण त्याचे उत्तर येण्यास निदान दोन महिने लागतील. पण तुम्हाला जाण्याची गडबडच असेल तर तार पाठवू. खर्च अर्थातच तुम्ही द्या. कराचीहून बसण्यासाठी आठवड्यांतून एकदां बोट निघावयाची. त्यांत ही पासपोर्टची अडचण. तेव्हा अडल्या नारायणाप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांची योजना मान्य करण्यावाचन गत्यंतरच नव्हते. ब्रिटिश साम्राज्यांत जाण्यास ब्रिटिश प्रजाजनास इतका त्रास का पडावा ? बरें, ही तारेने परवानगी मिळविण्याची पद्धत नेहमीचीच आहे. रोजच्या कांही तरी तारा बगदादच्या गुप्त पोलिसांस या संबंधी जातातही. प्रस्तुत प्रतिनिधीसंबंधीची तार सरकारी अधिकाऱ्याने लिहिली. तींत पंचवीसतीस शब्द होते. इराकच्या तारांचे दर प्रतिशब्दास साडेतीन आणे, साडेपांच आणे, अकरा आणे असे चढते होते. उत्तरासाठीही पैसे भरणे आवश्यक असल्याने मध्यम मार्ग स्वीकारूनही सुमारे बारा रुपये तारखात्याच्या खिशांत भरावे लागले ! आता सरकारच्या मनांत प्रजेला खर्च कमी पडावा अशी इच्छा असती तर कांही सांकेतिक शब्द ठरवून हे कार्य भागवितां आलें असते. आणि इराक सरकारकडून आलेली अनुज्ञा तशा सांकेतिक भाषेतच होती. त्यांचे उत्तर चार शब्दांतच आलें. पण आमच्या राजकार्यधुरंधर आणि प्रजाहिततत्पर सरकारने अशी सांकेतिक भाषेची व्यवस्था का करू नये ?

 बुशायरचा मुक्काम-या अडचणींतूनही पार पड्न बगदादच्या गुप्त पोलिसांकडून अनुज्ञा आल्यावर बोटीचे तिकिट मिळविलें, शुक्रवारी विलायतेहून आलेल्या टपालासह बसऱ्याला जाणारी 'फास्ट मेल' बोट मुंबईहून निघून शनिवारी रात्री कराचीस येते. तीच रविवारी सकाळी दहा वाजतां पुढे इराणच्या आखाताकडे निघते. बसऱ्याला जाण्याचा सोईचा मार्ग हाच होय. कराचीहून निघाल्यावर चौथे

३४