पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/58

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

बहुतेकांच्या परिचयाची असावी. कारण त्या टोपीवरूनच तो ओळखला जातो. तशाच प्रकारची टोपी इराकी लोक घालतात. फरक इतकाच की, नेपोलियनची टोपी आडवी होती आणि इराक्यांची उभी असते!

-केसरी, ता. २६ फेब्रुआरी, १९२९,


(९)

 बायकांचा बुरखा–इराकांत स्त्रियांच्या वेषपद्धतींतही पुष्कळ प्रकार आढळतात. बुरख्याची चाल इस्लामानुयायी स्त्रियांत पूर्वीप्रमाणेच आहे. आणि वरपासून खालपर्यंत काळ्या डगल्यांतून हिंडणारी भुतें रस्त्यांत पुष्कळ दृष्टीस पडतात. स्त्रीजात्यनुरूप विनयाचें हें द्योतक म्हणावें तर रस्त्यांत उभे रहाणारांस बेशक धक्का देऊन पुढे जाण्याचा अशा काळ्या वस्त्रांतर्गत व्यक्तींचा सराव असावा असें वाटतें. कित्येक वेळां काळ्या बुरख्यांतून गौरवर्णीय अर्धा मुखचंद्र डोकावतांना दिसतो; पण कोणाची चाहूल लागली की, लगेच तो कृष्णमेघाखाली दडतो. यहुदी लोकांतही बुरख्याची चाल आहे, पण ती कमी प्रमाणांत. गुडघ्यापर्यंतचे झगे, तलम पण कातड्याच्या रंगाचे मोजे, कापलेले केस, रंग फासलेली मुद्रा इत्यादि पाश्चिमात्य वेषशास्त्रांतील आधुनिक प्रकारांचें हुबेहूब अनुकरण ज्यू स्त्रिया करतात; पण त्यांत पौर्वात्यांचें वैशिष्टय कांही तरी असतेंच. विवाहादि समारंभप्रसंगी आपल्या स्त्रियांत बनारसी शालू पांघरण्यास घेण्याचा रिवाज असतो. तसाच एक जाडा रेशमी पण जरीचें काम केलेला शालू ज्यू स्त्रिया घेऊन रस्त्यावर हिंडत असतात. तोंडावर सावली पाडण्यासाठी एक काळ्या कापडाची चार बोटें लांबीरुंदीची पट्टी कपाळावर बांधलेली

५२