पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/59

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आफ्रिकेतील हुंडीचा बुरखा

असते. हा अवशिष्ट राहिलेला काळा बुरखा होय ! बाकी त्यांचा शालूच असा असतो की, त्याखालचे इतर कोणतेही कपडे प्रेक्षकांच्या दृष्टीस पडत नाहीत.
 ख्रिस्ती स्त्रियांचाही अशाच पद्धतीचा वेष असून बुरखा जवळ जवळ नसतोच म्हटले तरी चालेल. ही बुरख्याची चाल सौंदर्य लपविण्यासाठी म्हणजे सुस्वरूप ललना कोणाच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून प्रचारांत आली असावी असा तर्क आहे. पण अगदी खास 'आफ्रिकेच्या हुंडी'लाही बुरखा का लागावा ? या प्रश्नाचे नीट उत्तर देतां येत नाही. अरबस्तानांत आणि इराणांत पूर्वी हबशी गुलामांचा फार प्रचार असे. घरगुती चाकर नोकर हे आफ्रिकन नीग्रो असावयाचे असा श्रीमंतांचा थाट ! पण सध्या गुलामगिरीचे उच्चाटन झाल्यापासून पूर्वीचे गुलाम आता स्वतंत्र नागरिक झाले आहेत. अशा नीग्रो स्त्रिया देखील बुरखा घेऊन रस्त्यांतून जातात. ते पाहून आणि मधून मधून त्यांचे तोंड अर्धवट बाहेर निघते तेव्हा बुरख्याच्या कापडाशी सामना देणारा वर्ण पाहून या चालीचे वैय्यर्थ्य लक्षांत येतें. कांही स्थानिक नागरिकांनी असे सांगितले की, लहान मुले अशा राक्षसी स्वरूपास पाहून भितात, तेव्हा इतर स्त्रियांनी पडद्याची चाल सोडली तरी चालेल, पण नीग्रो स्त्रियांनी सोडू नये असे आम्हांस वाटते !

 गौरवर्णीय लोकांत नीग्रो लोकही मिसळलेले आहेत. अरबांपेक्षा ते हुषार यात शंका नाही. तांदुळाच्या ढिगांत काळे खडे जसे स्पष्टपणे निवडून काढतां येतात तसेच इराकी प्रजाजनांपैकी नीग्रो वेचून काढणे सोपें आहे. हरतऱ्हेची उदरभंरणाची कामे मोठ्या इमानेइतबारें करण्यांत नीग्रो पुढे आले आहेत असे दिसते. शाळेंत मोठ्या शहाणपणाने त्यांनी वरच्या जागा पटकाविल्या असल्याचें दिसून आलें.

५३