पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/65

हे पान प्रमाणित केलेले आहे.
मुक्काम तिसरा : आबादान
( १० )

 "किंसुखमप्रवासगमनम् " असें भर्तृहरीने का म्हटले असावें हें बसऱ्याहून इकडे येतांना उत्तम प्रकारे मनावर बिंबलें ! बसरा व आबादान यांमधील अंतर फार तर पन्नास मैल असेल. नेहमी मोटारींची जा–ये चालू असते; तरीही त्रास व अडचणींनीच मनुष्य बेजार होतो. याचे कारण म्हणजे ही दोन्ही गावे भिन्न भिन्न राज्यसत्तेखाली आहेत हे होय. इराकी राज्यांत बसरा शहर मोडते व आबादान इराणी अमलांतले आहे. इराणमध्ये कोणाही प्रवाशास इराकांतील शहराहून जाणे झाल्यास देवी काढल्याचा व प्लेगची लस टोचून घेतल्याचा असे दोन दाखले मिळवावे लागतात. थोडक्यांत सांगावयाचे तर असे म्हणता येईल की, देवी काढवून घेऊन इनॉक्युलेशनहीं करून घ्यावे लागते ! हे दुहेरी विकतचे श्राद्ध फुकटांत पदरात पडते ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे. पण लस टोचतांना आपल्याकडे जितक्या काळजीपूर्वक स्वच्छतेची खबरदारी ठेवली जाते तितकी इकडील प्रांती घेत नाहीत असे दिसते. उदाहरणार्थ, प्लेगची लस टोचण्यापूर्वी पिचकारी व सुई उकळत्या व्हॅसलीनने इतरत्र धुतात. परंतु ही दक्षता बसन्यास मुळीच बाळगली गेली नाही. उलट गंजलेल्या सुया उपयोगात आणाव्या लागल्या ! महाराष्ट्रांत व कर्नाटकांत पूर्वी प्लेगचे वेळीं उडालेल्या कहरासही कारण अशा प्रकारचा निष्काळजीपणाच होता हे ठाऊक असल्याने आपणांवरही काय प्रसंग येईल कोण जाणे अशा भीतीनेच दोन तीन दिवस मी ग्रस्त होतो. पण सुदैवेंकरून कांहीही झालें नाहीं.

५९