पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/67

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भूमातेचा लोखंडी शृंगारसाज

ओलांडून आबादान बेटांत प्रवेश करावयाचा व मोटारमधून मुकाम यावयाचे असा हा चढउताराचा प्रवास आहे. नदीवर पूल कोठेही नसला तरी, लहानमोठ्या होड्या इकडून तिकडे सारख्या येरझारा घालीत असल्याने कालक्षेप न होतां पैलतीरी जाता येतें.
 इराणांत घासलेट तेलाचा साठा विपुल आहे आणि ते खणून काढून शुद्ध करण्याचे काम एका विलायती कंपनीस मिळाले आहे. त्या सर्व प्रचंड कारखान्याचेच गाव म्हणजे आबादान होय. अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनीच्या कारखान्यामुळेच आबादान हे गाव वसले असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. कारण आबादानची वस्ती सुमारे ७०,००० असून ती बहुतेक सर्व त्या कंपनीच्याच कामगारांची व त्यांच्या कुटुंबांतील मंडळीची आहे. आगबोटींतून आबादानकडे पाहिलें म्हणजे एका मोठ्या औद्योगिक शहराजवळ आपण आहोत असे वाटते. काळा धूर निळ्या आकाशांत सदैव सोडणाच्या काळ्या उंच चिमण्या, आणि तेलाच्या मोठमोठ्या टाक्या इतकेच काय ते दुरून दिसते. भूमातेच्या गळ्यांत हा लोखंडी शृंगारसाज बिडाच्या मोठ्या नळांत ओवून घातला आहे, अशी कल्पना एखाद्या कवीची, त्या प्रचंड टाक्या व त्यांना जोडणारे नळ पाहून होईल. मुंबईला वाडीबंदरच्या बाजूस जसे रॉकेल(तेला)चे विस्तृत हौद आहेत, तसे तीनशेहून अधिक हौद एकट्या आबादान च्या कारखान्यांत आढळतील. सुमारे ३६ चिमण्या आपल्या तोंडातून काळा धूर फुकत असलेल्या पाहून कोणासही हा कारखाना पहाण्याची उत्कट इच्छा होते. या अवाढव्य विस्ताराच्या औद्योगिक शहरांत सुमारे तीन हजार हिंदी लोक आहेत. मुख्यतः - 'बाबू ' लोक, म्हणजे कारकून, यांचाच भरणा जास्त. कांही मजूरही आहेत. हिंदी वस्तीत निमगोरेच अधिक असले तरी

६१