पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/69

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेलाच्या विहिरीसाठीं शोध

विशेष ज्वालाग्राही असतात. म्हणून घासलेट (तेल) में बंद केलेल्या नलिकाकूपांमधून ( ट्यूब बेल्स ) पंपाने उपसून काढतात. उत्तम वाकबगार पानाडे विहिरीस पाणी कोठे लागेल हे सांगण्यांत पटाईत असतात, तसेच इकडे ‘तेलाडे'ही असतात आणि त्यांच्या सांगण्यावरून विहीर खणण्यास प्रारंभ होतो.

 इराणच्या भागांत विपुल खनिज तेल सापडेल असे भूगर्भवेत्ते म्हणतं. इ. स. १८७२ पासून एका साहेबाने या तेलखाणी शोधन काढण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करून पाहिले. परंतु विहिरीत तेलाचे झरे न आढळतां पाण्याचेच लागले. त्याचा प्रयत्न निष्फळ झाल्यावर इ. स. १९०१ मध्ये दुसरा भांडवलवाला आपले नशीब बलवत्तर आहे की नाही ते पहाण्यास आला. त्याने साठ वर्षांचा करार करून पृथ्वीच्या पोटाला भोके पाडून पहाण्यास सुरुवात केली. सात वर्षांच्या प्रयत्नानंतर मसजिद-इ-सुलेमान येथे एक मोठे थोरलें जोराचे कारंजें उडून आंत पुष्कळ तेलाचा साठा असल्याचे कळले. इराणी राज्यांत नैसर्गिक रीत्या सापडणाऱ्या या तेलाचा योग्य तो उपयोग इराणी राज्यास व्हावा आणि इराणी प्रजेचे हित व्हावे या उदात्त हेतूंनी प्रेरित होऊन • जगाच्या कल्याणा'चा मक्ता घेणाऱ्या इंग्रजांनी एक कंपनी स्थापन केली ! तिचे नांव 'अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनी, लिमिटेड,' असे आहे. कोटयवधि रुपयांचे भांडवल गोळा करून खाणीवर पंप बसविण्यात आले. नवीन विहिरी खोदल्या गेल्या आणि खाणींतून निघणाऱ्या तेलाची फायदेशीर विल्हेवाट लावण्याची योजना आखली गेली. खाणींतून आलेले तेल हिरवट काळसर असून दाट असते. ते प्रथमतः तापवून मग त्याचे निरनिराळे प्रकार करता येतात. मसजिद-इ-सुलेमानपासून तेल कोठे न्यावे हा प्रश्नच होता. कारण

६३