पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/77

हे पान प्रमाणित केलेले आहे.
मुकाम चवथा : बगदाद
( ११ )

 खलिफांच्या या प्राचीन नगरींत मुसलमानी धर्माचे प्राबल्य विशेष आहे हे सांगण्याची आवश्यकता नसली तरी, बड्या आणि छोट्या भाईंना इकडे किती मान मिळतो हे पहाणे हिंदी प्रजेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. बगदादमधील सरकारी व स्वतंत्र अशा बहुतेक विचारवंतांना भेटावयास गेल्यावर हिंदुस्थानांतील मुसलमानांच्या वेडेपणाबद्दल त्यांनी आपण होऊनच कुतूहलपूर्वक पृच्छा केली. कित्येकांनी तर अल्लीबंधुंची त्यांच्या दृष्टीने काय योग्यता आहे हे वर्तमानपत्रांतून स्पष्टपणे जनतेपुढे मांडण्यास आग्रहपूर्वक बजावलें. मौलानाबंधूची इस्लामी धर्मप्रीति पाहून हिंदी लोकांना काय वाटत असेल ते असो. पण इकडील अग्रेसर मंडळी अल्लीबंधुंना 'नसता चोंबडेपणा करणारे आगंतुक' ही पदवी देतात !

 आपल्याकडे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे अध्यक्ष श्री. पटेल आहेत, तसेच इराकी प्रतिनिधीमंडळाचे माजी अध्यक्ष श्री. रशीद बेग गिलानी म्हणून एक राष्ट्रीय गृहस्थ आहेत. त्यांनी दोन खात्यांची दिवाणगिरीही केली आहे. त्यांच्या मुलाखतीस गेलो असता त्यांनी प्रथमत:च बजावून सांगितले की, “ तुमच्या देशांतील वर्तमानपत्रांतून शौकतअल्ली आणि त्यांचे बंधु ( मौलाना ही पदवी चुकून देखील त्यांच्या तोंडी आली नाही), यांच्या लुडबुडीची माहिती लोकांना करून द्या. आमच्या देशांतील धार्मिक व्यवस्थेची त्यांना इतकी आस्था का वाटते हे कळत नाही. मण हिंदुस्थानांत बसून 'असे करा' 'तसे नको ' इत्यादि हुकूम आम्हांस सोडण्याची उठाठेव यांना

७१