पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

त्या स्त्रीवर बळजबरी करणे, त्या स्त्रीला किंवा तिच्या ताब्यातील मुलांना घराबाहेर जाण्यास प्रतिबंध करणे, सर्वसाधारण घटनाक्रमात त्या स्त्रीला एखाद्या व्यक्तीस भेटण्यास प्रतिबंध करणे, त्या स्त्रीची इच्छा नसतांना सुद्धा लग्न करण्यासाठी बळजबरी करणे, त्या स्त्रीला तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्यास प्रतिबंध करणे, त्याच्या/त्यांच्या पसंतीच्या विशिष्ट व्यक्तीशी लग्न करण्यासाठी त्या स्त्रीवर बळजबरी करणे, आत्महत्या करण्याची धमकी देणे, शिवाय इतर कोणताही शाब्दिक किंवा भावनिक हिंसाचार करणे. ४. आर्थिक हिंसाचार - उदा. त्या स्त्रीच्या किंवा तिच्या मुलांच्या निर्वाहासाठी पैसे न देणे, त्या स्त्रीला किंवा तिच्या मुलांना अन्न-वस्त्र व औषधे इत्यादि न देणे, त्या स्त्रीला नोकरी करण्यास प्रतिबंध करणे/ परवानगी न देणे/ अडथळा निर्माण करणे, त्या स्त्रीचे वेतन/मजुरी इत्यादि पासूनचे उत्पन्न हिरावून घेणे किंवा तिला ते उत्पन्न वापरू न देणे, तिला तिच्या राहत्या घरातून बळजबरी बाहेर काढणे, तिला घराच्या कोणत्याही भागात प्रवेश करण्यास किंवा त्याचा वापर करण्यास मज्जाव करणे, कपडे किंवा वस्तू किंवा सर्वसाधारण घरगुती वापराच्या वस्तू वापरण्यास तिला मनाई करणे, भाडयाचे घर असेल तर भाडे इत्यादि न देणे. प्रकरण चौथे कौटुंबिक हिंसाचारचे परिणाम कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी झालेल्या स्त्रीया किंवा मुलांवरूनही त्यांच्यावर काय प्रकारचा हिंसाचार झाला आहे याचा अंदाज येतो. हिसांचार करणा-याच्या हेतूपेक्षा हिंसाचारग्रस्त व्यक्तीवर झालेला परिणाम हा आपण जास्त गंभीर पणे पाहिला पाहिजे. उदा. एखादी ओरडून बोलणारी व्यक्ती म्हणेल माझा त्या स्त्रीला किंवा त्या मुलाला घाबरवण्याचा हेतू नव्हता, पण त्याच्या ओरडण्याने ती स्त्री किंवा ते मुल घाबरत असेल तर त्या व्यक्तीचे ओरडणे ही गंभीर घटना आहे, तिची दखल घेतलीच पाहिजे कौटुंबिक हिंसाचाराचा परिणाम स्त्रियांवर दिसतो, मुलांवर दिसतो, समाजात दिसतो तसाच तो हिंसाचार करणा-यावरही दिसतो. परिणामांची काही उदाहरण आपण बघू या : १.शारीरिक- १. अपंगत्व - तात्पुरत/कायमस्वरूपी येऊ शकते. २. कानामागे मारल्यामुळे ऐकायला न येणे/ बहिरेपण येणे, ३. गर्भपात होणे. ४. नको असलेले गरोदरपण. ५. जखमी होणे-आपण पाहतो की स्त्रीयांना सतत काहीना काही जखमा असतात. ६. एखादा अवयव निकामी होणे. लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३१