पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

... आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई
धर्म वेगळा नाही आम्हा, जात वेगळी नाही ...
... जोडो भारत, जोडो भारत नवयुगने ललकारा है
भारत हमको प्यारा है ...

 अशा गाण्यांच्या लकेरी आभाळात भिरभिरतात. सहलीला निघालेल्या मुलामुलींच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा उत्साह . शाखेत येणाऱ्या मुलामुलींची वाढती संख्या पाहून मनोमन पटते की ग्रामीण भागातील मुलांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे ऐतिहासिक काम सेवादल करू शकेल . पण ते करण्याचे बळ आज सेवादल सैनिकात उरले आहे का?

܀܀܀

॥ १८॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....