पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

आवाज फक्त धावणाऱ्या टायर्सचा. मागे वसलेल्या मुली दहा त चौदा या वयोगटातल्या पण आभाळ भरून आल्यावर कसे सारे विडीचूप असते तसे वातावरण मलाच कोंडल्यासारखे होते. आपणच प्रश्न विचारावेत असा विचार करून मी सुरुवात करते. वर्गातली शहाणी मुले कशी पटापटा उत्तर देतात तशी नावाची चळत माझ्यासमोर कोसळते. नर्मदा कवतिकराव भिसे, रहाणार कुंटेफळ. संगीता तुकाराम माळी, रहाणार पाटोदा, अलका रघुनाथ खरात, रहाणार भावठाणा : वगैरे वगैरे. साऱ्याजणी अर्ध्यात शिक्षण सोडून घरी बसलेल्या.
 मुलींनी भराभरा नाव सांगितली नि परत टायर्सचा आवाज कानात घोंगावू लागला. मग सुनीतानं गाण्याच्या भेऺड्या खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला सुनीतां नि माझीच जुगलबंदी सुरू होती. पण माझे गाडे ए या अक्षरावर अडले आणि एकीनं, किनऱ्या आवाजात सूर लावला -
 ए जी ओ जी लोजी सुनोजी
 वन टू का फोर फोर टू का वन्

 पोरींना सिनेमाची गाणी अ पासून ज्ञ पर्यंत पाठ होती. पन्नाशीतल्या भाभी 'मेरे सामनेवाली खिडकीमे एक चाँदका टुकड़ा रहता है.' ठेक्यात म्हणताना पाहून त्यांची भीड चेपली असावी. मग त्यांनीही सिनेसूर, लावला, उदगीरच्या अलीकडे हापशाचा पंप दिसला आम्ही गाडी थांबवला. आंव्याच्या सावलीत शिदोऱ्या सोडल्या. शिळी भाकर, कांद्याचा झुणका, तळलेल्या मिरच्या यांच्यासोबत गप्पा पण रंगल्या.
 हेमा सांगत होती, " मास्तर लई मारकुटा व्हता. पाटी न्हेली नाय की लई मारायचा नि मायला पाटी मागितली की ती पाठीत दणके घालायची. म्हनायची खायला भाकर न्हाई नि पाटी कुठून आनू ? आमच्या अण्णाले रोज दारू लागती. मग पैसा कुठून येनार? चौथीत गेलेच न्हाई साळला पन आता लई पस्तावा होतुया. रातच्या शाळत जावसं वाटतं. येईल का व मला आता शिकायला..वसल का डोसक्यात समदं ?"
 अलकाची आई कामाला जाते. तिचा बाप मुंबईला काम शोधायला गेला, तो माघारी आलाच न्हाई. चारपाच वर्स वाट पाहिली मग म्होतूर लावला . सावत्र बापाची तिला भीती वाटते. आईला झालेली लेकर कोण सांभाळणार? अलकाची तिसरीतूनच शाळा सुटली. आई म्हणते, तुझ्या लगनाचा भार या मानसान डोसक्यावर घेतलाय. तुजा बाप म्हनून जलमभर तुला सावली देनार हाय. मग त्याच्या लेकरांसाठी तू वी झीज सोसावा हवी, अलकाला पुस्तक वाचायची आवड आहे. पण पुस्तक कोण देणार तिला ?
 मंगू, ठकू नि कावेरी तिघीजणी सातवीतून घरी वसल्या. का तर शहाण्या झाल्या म्हणून. शहाण्या पोरी शाळेत गेल्या की विघडतात असं पालकांना वाटतं.

॥ २० ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....