पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

पालकांना म्हणजे म्हाताऱ्या आजाआजींना. आईला मात्र शाळेत शिकवायची हौस आहे. पण सासूममोर कशी बोलणार? नि तिचे ऐकणार तरी कोण? तरीही तिने नवऱ्यामागे लागून आपल्या लेकीला शिवणक्लासात घातले. तिचे पाहून दुसऱ्या दोघी तयार झाल्या.
 कावेरी उत्साहान विचारते आहे. "ताई आम्हांला सातवीला बसवाल का ? आम्ही घरी अभ्यास करु. तुम्ही विंग्रजी शिकवाल ना आम्हाला ?
 गप्पांच्या ओघात आम्ही उदगीरला पोचतो. तिथे तर दोन अडीचशे चिमण्या मुक्तपणे चिवचिवताहेत. आमच्या चिमण्याही आमचे हात सोडून त्या थव्यात मिसळून जातात
 आम्ही परतीच्या वाटेने पोरीची अखंड बडबड. सगळ्यांना कंठ फुटलेले. बदामी डोळ्यांची रेखा विचारते, "भावी, मी बंगाली गाना गाऊ?
 आसामात वाढलेल्या या वंगाली-मुलीची भापा म्हणजे मराठी-हिंदी असमिया यांचे मजेदार मिश्रण आहे... ती गाणं सुरू करते. त्या गाण्याचे शब्द ओळखाचे नाहीत पण तो शांत, धीमा तरीही वाणासारखा वोचरा सूर नक्कीच वंगाली आहे
 "ताई, खूप वेस्ट वाटलं आम्हांला. लई मज्जा आली. पुना कवा शिविर भरवणार? आमची आठवण ठेवा हं." त्यांचे बोल ऐकताना माझ्या मनात दाटून येत वाटतं, दान दिवस मोकळ्या वाऱ्यात खुललल्या या पोरी गावी गेल्यावर आपल्या मनाच्या खिडक्या परत बंद करून घेतीला की मोकळ्या ठेवतील?
 आणि जरी माेकळ्या ठेवाव्याशा वाटल्या तरी या दोन दिवसांच्या मोहरणाऱ्या हवेन टवटवीत झालेली मनं . पूर्वी कधीही न अनुभवलेल्या दुःखानी पेटतील का?

܀ ܀ ܀
दोन

 टी. व्ही. च्या बावीस इंची पडद्यावर युनिसेफ इंडियाने तयार करवून घेतलेली नकुशा ही फिल्म सुरू आहे. समाेर माेना आणि तिची मैत्रीण दंवऻच्या कोवळ्या थेंबासारखी नकुशा विलक्षण गोड तरीही फिकुटलेला नितळ चेहरा आणि शिकेकाईच्या वियांसारखे काळेभोर चकमकीत डोळे. ती निरागसपणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देते आहेत. ती कधी हट्ट करीत नाही, कारण मग मार मिळतो आणि झोपल्यावर स्वप्नही पडत नाहीत, मनातून खूप शिकायचं आहे पण शिकणार कशी? घरातली कामं कोण करणार? एखाद्या चिमुकल्या यंत्रासारखे दिवसभर घरघरत रहावचे या अशा जगण्याबद्दल मनात खेद नाही. कारण खंत करून उपयोग काय? या नकुशाच्या निरागस भोळ्या दुःखाने मोना चक्रावून गेली आहे. नकुशाच्या निमित्ताने भारतातील वालिकांच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीचं दर्शन घडवणारी आकडेवारी वाचून, सुस्थिर आयुष्याची सवय झालेल्या माेनाला आतून कंप सुटला आहे.

उमलतीचे रंग, गंध ॥२१॥