पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

टणक खरवरीत पण आतून मावाळू. खोबऱ्याच्या सायीसारख्या प्रेमळ. त्या तोंडानं ओरडत, पण डोळ्यातून हसत. त्यांची शिक्षा करण्याची पद्धत मोठी गोड. शिक्षा म्हणून गाणे म्हणायला लावायच्या किंवा कविता पाठ करायला लावायच्या.
 तर अशाच एका श्रावणातल्या सोमवारी विमल उशिरा शाळेत आली. विमल खूप हुशार. गणितात पक्की, इंग्रजीत नेहमी पहिला नंबर. बहुधा जोशीसरांचा तास असावा. तिने नेहमी पहिले यावे ही त्यांची इच्छा. त्या मायेपोटी ते तिला अद्वातद्वा रागावले. पाच पट्ट्या हातावर खाऊ म्हणून दिल्या. विमल ओठ गच्च मिटून मारखी रडत होती. आम्ही मैत्रिणींनी खोदून खोदून विचारले पण ती गप्पच. शाळेतून परतताना तिने हळूच हाक घातली, शैला आपण बरोवर जाऊ या उषा मिनीला पुढे जाऊ दे. त्या निर्मनुष्य रस्त्यावरून आम्ही दोघीच चालत होतो. विमाने तिला उशीर होण्याचे कारण सांगितले . विमाची आई सकाळी बाळंत झाली , मोठी प्रभा अकरावीच्या अभ्यासासाठी मैत्रिणीकडे गेलेली. दाई वेळेवर आली नाही. आईचे बाळंतपण विमललाच करावे लागले. अभ्यास वुडू नये म्हणून प्रभा स्वयंपाक करून शाळेत आली. विमलला मात्र आई नि वाळाचे सगळं उरकून शाळेत यावे लागले. श्रावण सोमवारी सकाळची शाळा असे. विमाच्या आईचे ते आठवे बाळंतपण होते. विमा मॅट्रिकला पहिल्या वर्षात उत्तीर्ण झाली. पण ती पुढे शिकू शकली नाही.
 आम्ही तिला रोझी म्हणत असू खरं नाव सरोजा गुलाबी गोरी कातीव नाक फुगीर गाल, काळेभोर डोळे, उभट चेहरा, ती नक्कीच सुंदर होती. कारण मला आठवते तशी ती नाचात नेहमी पुढे असायची. नाटकात सीता, कृष्ण, राधा अशा खास भूमिका जणू तिच्याच असल्यासारख्या तिला मिळत. मी एकदा रडले होते तर वाई फिसकरल्या होत्या की राधा कधी नकटी असते का म्हणून तिचे कपडेही नेहमी तिला खुलावणारं असत. कापडांचा पोत साधाच असे. पण टोमॅटो कलर, फिराझा कलर असले रंग आम्हाला तिच्याकडून कळत. तिचे घर गावाबाहेर होते. ती सायकलवरून येई. तिच्याभोवती एक धुक्याचे गूढ... जादुई वलय अधिक दाट होऊ लागले. ती कुणाशी तरी नेहमी बोलते, कुणी तरी तिला सायकलवरून पोचवायला येते. ती मुद्दाम उशिरा घरी जाते, वगैरे वगैरे.. एकदा आम्ही डवा खात वसलो होतो शाळेच्या कंपाऊंडच्या भिंतीजवळच्या वुचाच्या झाडाखाली. इतक्यात एक वारीकसा दगड भिरभिरत आमच्या मध्यात येऊन पडला. त्या दगडांभोवती कागदाची घडी दोऱ्याने घट्ट बांधलेली होती. उषाने तो दौरा सोडून कागद उलगडला. आत चिठी होती आणि नाजुक गुलावी रंगांची सॅटिनची रिवन
 प्रिय सरू,
 काल तू माझ्याकडे पाहून हसली का नाहीस? मला रात्रभर झोप आली नाही. तुझं माझ्यावर प्रेम असलं तर परवाला ह्या गुलावी रिवनचा वो तुझ्या वेणीला वांध.

उमलतीचे रंग, गंध ॥२५॥