पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

क्षणात . दुसऱ्याच क्षणी मनाच्या मूर्खपणाची कीव येऊन हसूच आले. भरतीची लाट भरुन येते तशी उत्साहाची . धाडसाची एक लाट माझ्याही उरात तुडुंव भरून आली आणि मी दिमाखाने इंदूरचे तिकीट मागितले .
 ....आता मी सराईत इंदूरकरीण होते.
 माझा पेशा मास्तरकीचा . विद्यार्थी कसा , कुठे नि केव्हा भेटेल हे सांगता येणार नाही . पुढच्या वाकावर विराजमान झालेल्या तरुणाने मागे वळून पाहिले आणि तो ओळखीचे हसला. माझ्या मनात नेमके चित्र उमटेना.
 "कुठं निघालात मॅडम? धुळ्याला का?" त्याचा प्रश्र . मी धुळ्याची माहेरवाशीण आहे , हेही माहीत त्याला ! म्हणजे बऱ्यापैकी ओळखीचा दिसतोय. पण नेमकी ओळख पटेना . मी मनातल्या मनात उत्तर दिलं, "जपानला!"
 "जयपूरला निघालेय." मी म्हणाले. - "अरे व्वा! मीही तिकडेच निघालोय . जयपूरला नाथ सीडस् मध्ये असतो . मॅडम मी अमूकधमूक . तुमचा लाडका विद्यार्थी . शहात्तरच्या वॅचला होतो. आठवतं? जयपूरला पोस्टिंग आहे सध्या" त्याने सांगितले.
 माझ्या मनातल्या भित्र्या सशानं टुणकन उडी मारली. बरं झालं गं बाई . आता शेवटपर्यंत सोबत मिळाली . उगीच टेन्शन नको . या छोट्यामोठ्या टेन्शननीच नवे नवे आजार होतात.
 पण मनातल्या खोलात दडलेले मन मात्र हिरमुसले . एकट्याने प्रवास करण्यातलं थ्रिल , जिप्सी बनून मुशाफिरी करण्याची संधी हे लाडके लेकरू विरजून टाकणार की काय ? सारा मजा किरकिरा होणार तर !
 "पण मॅडम , मी इंदूरला दोन दिवस राहणारेय , मग जयपूरला जाणार आहे . तुम्हाला पत्ता देतो जरूर या. सकाळी नऊ वाजता दिल्ली पॅसेंजर आहे. तिला बसवून देतो."
 जयपूरपासून २०/२५ किलोमीटर्सवर असलेल्या लहानशा गावात महिलांचे राष्ट्रीय एकात्मता शिबिर होते. बारातेरा दिवसात राजस्थानची ओळख करून घ्यायची होती. सोवतही मिळाली होती. मी त्याच्याकडे येण्याचे आश्वासन दिले. मी खूश होते . चाळीशीचा उंवरठा पार केल्यावर , साहसाने येणाऱ्या तरुणाईचा अनुभवही मिळणार होता. तणतणत , फुणफुणत दिल्ली एक्सप्रेस - एक्सप्रेस नावालाच , हर ठेसनाला थांबणारी - स्टेशनात आली . अवतीभवती माणसांचा उफाळता समुद्र . जो तो दरवाजातून आत घुसायचा प्रयत्न करतोय . मी बायकांचा डबा शोधतेय. माझी बॅग शिष्यवराच्या हातात . लांबच लांब गाडी. अजमेर . चित्तोडगडचे डबे . काही डवे दिल्लीपर्यंत धावणारे . शेवटी बायांचा डबा सापडला. कशीतरी आत घुसले . डब्यात दहावीस महिला आणि पन्नाससाठ वाप्ये . माझा मराठी वाणा जागा झाला .

रेल्वेच्या डब्यातील आत्मा ॥३१॥