पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

महिला डब्यातल्या घाणीने मी वैतागले होतेच . रात्रभरचा प्रवास, झोपही हवी होती. मन्दसोरला उतरून थ्रीटायरयरमध्ये जागा शोधली. लेडीज डव्याला रामराम ठोकून मी वऱ्यापैकी सुरक्षित जागेत आले.
 समोरच्या बाकावर नवेले जोडपे वसले होते . वहुदा पहिल्या वाळंतपणानंतरची पाठवणी असावी. तरुण मुलीचे रडून लाल झालेले डोळे. मांडीवर नव्या कपड्यात गुंडाळलेला रेशमी गोळा. भलंमोठं सामान. जोडप्याच्या शेजारी एक वयस्कर मुस्लिम गृहस्थ . माझ्याशेजारी दिल्लीच्या विधिमहाविद्यालयात शिकणारा आर्यसमाजी तरुण. त्याच्या शेजारी मध्यप्रदेशातील एक बनिया आणि त्याची वयस्क आई .तिला पुष्करला जायचे होते.
 गाडीने वेग घेतला. एकमेकांजवळच्या वर्तमानपत्रांची देवघेव झाली. एवढ्यात बाळ किरकिरायला लागले. आवाज वाढू लागला. रडणे थांबेना. ती नवमाता हैराण झाली होती. 'वालपणही' नवेच . त्यालाही नेमके काय करावे हे कळत नव्हते. तिला मदत करावीशी वाटली. गेल्या चौदा वर्षात वाळ हातात घ्यायला मला तरी सराव कुठे होता? तो मऊ लुससुशीत गोळा निसटला तर? पण माझ्यातल्या आईने केव्हाच आपले हात पुढे केले होते. ते चिमुकले मुटकळे उराशी धरले. क्षणभर अंगावर रोमांच उभे राहिले. जरासे आंदुळले ... जोजवले. तर काय? चक्क ते शांत झाले. आणि झुलता झुलता झोपी गेले. त्या पोरसवदा आईच्या डोळ्यात कृतज्ञता भरून आली. चाचांनी लगेच जागा करून दिली नि म्हटले, वेटा बच्चे को सुलादो यहाँ.
 तरुण मुलगा वोरं घेऊन आला . सर्वांसमोर धरली. नको म्हणत , सर्वांनी तोंडात टाकली.
 मग गप्पा सुरू झाल्या. कोण? कुठे? कशाला? वगैरे. आणि पाणी वळणाला वळावे तसा गप्पांचा ओघ पंजाबच्या दिशेने वळला. पंजावच्या प्रश्नाने प्रत्येकजण व्यथित झालेला. सरकारच्या धोरणावर टीकाटिप्पणी करताना शब्दांना धार चढत असली तरी देशाच्या एकसंधतेला पडणाऱ्या चिरांमुळे प्रत्येकाच्या मनात दुःख आणि चिंता होती.
 "देखो . मेरा वेटा दुबईमे था पाच साल. लेकिन विवीवच्चे यही थे . इंडियामें. कुछ भी कहो .. पूरा जग देखके आया ." ईरान .. इराक कुठेही. पण भारतात जे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता मिळते ती कुठेच नाही.
 "आम्हां गरीब मुसलमानांना खरा धर्म पाळायचा असतो. त्याला कोण आणतंय आडकाठी? मी ऑटोरिक्षा चालवायची. चार पोरींची लग्नं केली. दोन मुलं आहेत .एक डॉक्टर झाला. दुसरा छोटामोठा व्यापार करतो. अगदी कालपरवापर्यंत झोपडीत रहात होतो . आता सुखाची रोटी खातो. आजकाल ये लीडरलोगां और गुंडा एक हो गये है. वोही लोगोंको उसकाते है . खून खराबा करते है. बीचमे गरीब मरता

रेल्वेच्या डब्यातील आत्मा ॥३३॥