पान:व्यायामशास्त्र.pdf/7

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
व्यायामशास्त्र या पुस्तकावर अभिप्राय

 व्यायामशास्त्राचे ज्ञान केव्हांही फार उपयोगाचे आहे. नवीन पिढीस तर ते अगदी अवश्य आहे. रा. गोखले यांनी नवीन लिहिलेले व्यायामशास्त्रावरचे पुस्तक फार चांगले उतरले आहे. यांत त्या शास्त्राचा सर्वांगाने विचार केला आहे, व जरूर तितकी सर्व शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत दिलेली आहे. ब्रह्मचर्याचा भाग सर्व तरुणांनी अवश्य वाचून लक्षात ठेवण्याजोग आहे. व्यायामांच्या पद्धतीचे यांत चांगले विवेचन केलेले आहे. त्याजकडे लक्ष देऊन व्यायाम करणा-या तरुणांनी व्यायाम केला असतां थोड्या वेळांत चांगला फायदा होईल. व्यायाम, आहार व ब्रह्मचर्य ही शरीरसामथ्यांची तीन मुख्य अंगे आहेत; ह्या तिहींचा या पुस्तकांत चांगला विचार केला आहे. याकरितां हे पुस्तक चांगले उपयोगी व अवश्य संग्राह्य झालेले आहे. 

मो. गो. देशमुख. एम. डी.

 रा. रा. रामचंद्र जनार्दन गोखले, बी. ए. यांनी लिहिलेले ' व्यायामशास्त्र नांवाचे पुस्तक माझ्या पाहण्यांत आले आहे. हल्लीच्या काळात व्यायामासारख्या महत्त्वाच्या विषयाची मीमांसा शास्त्रीय व व्यावहारिक दृष्टीने होण्याची फार आवश्यकता होती. ती या पुस्तकानें ब-याच अंशी कमी झाली आहे, असे म्हणण्यास हरकत नाहीं. सदरहू विषयाचे शास्त्रीयरीत्या विवेचन करण्यासाठी जरूर लागणारी वैद्यशास्त्रांतल माहिती रा. गोखले यांनी, मोठ्या श्रमाने मिळवून तिची मांडणी फार सरळ व सोप्या रीतीने केली आहे, हैं। यांस भूषणावह आहे. सदरहू पुस्तकांतील तत्त्वांची माहिती असणे, हैं। सवांसच फायदेशीर होणार आहे; परंतु त्यांतलें त्यांत या माहितीचा उपयोग तरुणपिढीस विशेष होणार आहे. आरोग्यरक्षणरूपी वित्ताचा संचय लहान वयांत जितका करावा, तितक्याचा फायदा प्रौढ व उतार वयांत मिळा ल्याशिवाय राहणार नाहीं.   एकंदरीत रा. गोखले यांनी लिहिलेले पुस्तक सर्वांस संग्रहणीय आहे, यांत शका नाहीं. 

पुणे. पं. वा. शिखरे. ता. ८ ऑगष्ट १९:९, एल्. एम्. अँड एस्. असिस्टंट सर्जन.